सेंचुरियन: सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
आज ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर आफ्रिकेचा संघ देखील विजयासाठी करो वा मरो असा प्रयत्न करेल. भारतीय टीमने जोहान्सबर्गमध्ये पहिला टी20 सामना 28 रनने जिंकला होता. आज जर पुन्हा टीम इंडियाने हा सामना जिंकला तर 8 दिवसात भारत दुसऱ्यांदा इतिहास रचणार आहे.
13 फेब्रुवारीला भारताने पाचवी वनडे जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेला 73 रनने धुळ चारत 25 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत सिरीज जिंकली होती.
टेस्ट सीरीजमध्ये 1-2 ने पराभवानंतर भारताने वनडे सीरीज 5-1 ने जिंकली. आता टी20 सीरीज जिंकून भारत क्लीन स्वीप करु शकतो. आयसीसी टी20 टीम रँकिंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानावर पोहचू शकतो. पण जर आस्ट्रेलियाने गुरुवारी न्यूझीलंडला टी20 त्रिकोणीय सीरीजच्या फायनल पराभूत केलं तर मग भारत तिसऱ्या स्थानी कायम राहिल.