क्लीन स्वीपसोबतच टीम इंडियाने केले हे ५ रेकॉर्ड, एक रेकॉर्ड हुकला

मुंबईमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने मात देत सीरिज ३-० ने खिशात घातली आणि यावर्षाचा शेवट टीम इंडियाने विजयासोबत केला. 

Updated: Dec 25, 2017, 06:41 PM IST
क्लीन स्वीपसोबतच टीम इंडियाने केले हे ५ रेकॉर्ड, एक रेकॉर्ड हुकला title=

मुंबई : मुंबईमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेला ५ विकेटने मात देत सीरिज ३-० ने खिशात घातली आणि यावर्षाचा शेवट टीम इंडियाने विजयासोबत केला. 

किती सामने खेळले?

यावर्षी टीम इंडियाने विजयाबाबतचे अनेक रेकॉर्डस आपल्या नावावर केले. यावर्षी टीम इंडियाने जितक्याची बायलेट्रल सीरिजमध्ये भाग घेतला, त्यात त्यांना एकातही पराभवाचा सामना करावा लागला नाही. टीम इंडियाने २०१७ मध्ये २ किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांच्या १४ सीरिज खेळल्या. श्रीलंकेवर ३-० ने विजय मिळवत टीम इंडियाने दुस-यांदा टी-२० मध्ये एखाद्या टीमचा क्लीन स्वीप केलाय. 

कितीमध्ये विजय मिळवला?

टीम इंडियाने सीरिज जिंकण्यासोबतच अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. पण एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यापासून टीम राहून गेली. टीम इंडियाने यावर्षी सर्व फॉर्मॅटमध्ये ३७ विजय मिळवले. यावर्षी जर टीम इंडियाने आणखी २ विजय मिळवले असते तर टीम इंडियाने एका वर्षात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा रेकॉर्ड नोंदवू शकले असते. एका वर्षात सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी २००३ मध्ये ३८ सामने जिंकले होते. 

यावर्षी टीम इंडियाने केलेले पाच रेकॉर्ड

- टीम इंडियाने श्रीलंकेचा ३-० ने सफाया केलाय. टीमने आपल्या टी-२० च्या इतिहासात दुस-यांदा एखाद्या टीमचा सफाया केलाय. याआधी २०१५ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया टीमला ३-० ने हरवले होते. 

- टीम इंडियाने २०१७ मध्ये सर्वच फॉर्मॅटमध्ये ५३ सामने खेळले ३७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला. टीम इंडियाला १२ पराभवांचा सामना करावा लागला. जगात यावर्षी सर्वात जास्त सामने जिंकणारी टीम ही टीम इंडिया आहे. एका वर्षात सर्वात जास्त सामने जिंकण्याच्या बाबतीत टीम इंडिया दुस-या क्रमांकावर आहे. 

- टीम इंडियाने श्रीलंके विरूद्ध टी-२० मध्ये १०वा विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंके व्यतिरीक्त ऑस्ट्रेलियाला सुद्धा इतक्याच सामन्यांमध्ये मात दिली आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाने ६-६ वेळा पराभूत केले आहे. तेच बांगलादेश आणि इंग्लंड विरूद्ध ५-५ सामने जिंकले आहेत. 

- टीम इंडियाने ३ सामन्यांच्या टी-२० सीरिजमध्ये लागोपाठ सहावी सीरिज जिंकली आहे. टीम इंडियाने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया, झिम्बॉब्वे, श्रीलंकेला हरवले. २०१७ मध्ये त्यांनी इंग्लंद, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला हरवले. 

- वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाने पहिला टी-२० सामना जिंकला. त्याआधी खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. वनडे मध्ये वानखेडेमध्ये टीम इंडियाने ५ वर्षांनंतर विजय मिळवला आहे.