मुंबई : विराट कोहलीसाठी (Virat Kohli) 2021 हे वर्ष फार वाईट राहिलं. विराटला टीम इंडियाच्या (Team India) तिन्ही फॉर्मेटमधील कर्णधारपद (Captaincy) सोडावं लागलं. विराट आयपीएलच्या 15 व्या मोसमातही एक खेळाडू म्हणूनच खेळतोय. कॅप्टन्सी सोडल्यामुळे आणि निराशाजनक कामगिरीमुळे विराटला प्रचंड मोठा फटका आहे. आपल्यासोबत असं काही होईल, याचा विराटने स्वपनातही विचार केला नसावा. (team india former captain virat kohli brand value as per duff and phelps)
ब्रँड वॅल्यूएशनबाबत विराटची पार मोठी घसरण झाली आहे. विराट सेलिब्रेटी ब्रँड वॅल्यूएशन स्टडी 2021 नुसार कमाईच्याबाबतीत अव्वलस्थानी आहे. मात्र त्याला ब्रँड वॅल्यूत मोठा झटका बसला आहे.
विराटला तब्बल 400 कोटींचा फटका
विराटने 2021 मध्ये ब्रँड व्हॅल्यूचा पाचवा भाग गमावला आहे. कन्सलटन्सी फर्म अॅन्ड फेलप्सच्या (Duff & Phelps) रिपोर्टनुसार, कोहलीची 2020 मध्ये 23.77 कोटी डॉलर (1806.61 कोटी) इतकी ब्रँड वॅल्यू होती. मात्र या ब्रँड वॅल्यूत 2021 मध्ये थेट 18.57 कोटी डॉलर (1411.39 कोटी रुपये) इतकी घसरण झाली. विराटच्या ब्रँड वॅल्यूत एकूण 22 टक्क्यांनी घट झाली.