Team India | "त्यांनी 1 शिवी दिली, तर तुम्ही.....",

भारतासारख्या देशात नेहमीच तुमचा मत्सर करणारे लोक किंवा लोकांचा समूह असतो ज्यांना तुम्ही अयशस्वी व्हावे असं वाटतं".   

Updated: Apr 26, 2022, 10:59 PM IST
Team India | "त्यांनी 1 शिवी दिली, तर तुम्ही.....",  title=

मुंबई :  टीम इंडियाचे (Team India) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता शास्त्रींनी मोठा खुलासा केला आहे. शास्त्रींनी ऑस्ट्रेलियात टीम इंडिया कशी जिंकली, याबाबतही सांगितलं. (team india former coach ravi shastri on india tour australia robert key)

शास्त्रींचा कानमंत्र

"आम्ही आक्रमकपणे खेळायचो आणि ज्यामुळे विरोधी संघाला संधी मिळायची नाही. मी मुलांना सांगितलं की तुम्हाला 1 शिवी दिली तर तुम्ही 3 शिव्या द्या, दोन आपल्या आणि एक त्यांच्या भाषेत",  असं शास्त्री म्हणाले. 

शास्त्री हे 2014 ते 2021 या दरम्यान एका वर्षाचा अपवाद वगळता टीम इंडियाचे कोच होते. या मधल्या एका वर्षात अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

कोचिंगचं औपचारिक शिक्षण नाही

"माझ्याकडे कोचिंगची कोणतीही पदवी नव्हती. लेव्हल 1, लेव्हल 2?  भारतासारख्या देशात नेहमीच तुमचा मत्सर करणारे लोक किंवा लोकांचा समूह असतो ज्यांना तुम्ही अयशस्वी व्हावे असं वाटतं", असंही शास्त्री यांनी नमूद केलं.