टीम इंडियाचा स्टार खेळाडू या धाकड गर्लसोबत घेणार सप्तपदी, पाहा कोण आहे तो?

टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत (IND vs SL Test Series 2022) व्यस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा लग्नाच्या तयारीत आहे.

Updated: Mar 8, 2022, 10:09 PM IST
टीम इंडियाचा स्टार खेळाडू या धाकड गर्लसोबत घेणार सप्तपदी, पाहा कोण आहे तो?   title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : टीम इंडिया सध्या श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा स्टार खेळाडू हा लग्नाच्या तयारीत आहे. टीम इंडियाचा स्पिनर राहुल चाहर (Rahul Chahar) त्याची गर्लफ्रेंड ईशानीसोबत (Rahul Chahar GirlFriend)  विवाह बंधनात अडकणार आहे. याआधी राहुलने अनेकदा ईशानीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (team india leg spinner rahul chahar is ready to marry with his girlfriend ishani at goa)
 
राहुल आणि ईशानीचा 2019 मध्ये साखरपूडा झाला होता. या साखरपुड्यात राहुलचा भाऊ आणि क्रिकेटर दीपक चाहरही उपस्थित होता. राहुल चाहरचे चाहते त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ईशानी हे पेशाने फॅशन डिझायनर आहे. 

राहुलचं लग्न कधी आहे, याबाबत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार,  राहुल-ईशानी 9 मार्चला गोव्यात विवाह करणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

राहुल चाहरची क्रिकेट कारकिर्द

राहुलने 1 वनडे आणि 6 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने अनुक्रमे 3 आणि 7 अशा एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने 42 सामन्यात 43 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.