हेमिल्टन : न्यूझीलंडमध्ये लागोपाठ 5 टी-20 सामने जिंकल्यानंतर भारताला पहिल्या वनडे सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. हेमिल्टनमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 4 विकेटने पराभव केला आहे. 3 सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयाने वनडे सीरीजची सुरुवात केली आहे.
टॉस जिंकत न्यूझीलंडने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आधी बॅटींग करताना टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमवत 347 रन केले होते. न्यूझीलंड पुढे 348 रनचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 103 रन केले. त्याने वनडे करिअरमधील आपलं पहिलं शतक ठोकलं. केएल राहुलने 64 बॉलमध्ये 88 रन केले. विराट कोहलीने 51 रन केले. न्यूझीलंडने 48.1 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत विजय मिळवला. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने 84 बॉलमध्ये 109 रन केले.
न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 32 रन केले. त्याने निकोल्ससोबत 85 रनची पार्टनरशिप केली. टॉम ब्लंडेलने 9 रन तर हेनरी निकोल्सने 78 रन केले. कर्णधार टॉम लाथमने 48 बॉलमध्ये 69 रन करत महत्त्वाची भूमिका बजावली. जिम्मी नीशमने 9 तर डी ग्रँडहोम 1 रनवर आऊट झाला.
टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने आपल्या वनडे करिअरमधील पहिलं शतक ठोकलं. अय्यरने 107 बॉलमध्ये त्याने 103 रनची खेळी केली. तर विकेटकीपर केएल राहुलने पांचव्या स्थानी येत 64 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली. राहुलने वनडे करिअरमधील 7 वं अर्धशतक पूर्ण केलं. तर कर्णधार विराट कोहलीने 51 रन केले.
पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल ही जोडी आज ओपनिंगला मैदानात उतरली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 50 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने 102 रनची पार्टनरशिप केली.