ICC Test Ranking: टीम इंडिया अव्वल स्थानी तर विराट दुसऱ्या स्थानावर कायम

आयसीसीने आज टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. 

Updated: Aug 18, 2020, 09:28 PM IST
ICC Test Ranking: टीम इंडिया अव्वल स्थानी तर विराट दुसऱ्या स्थानावर कायम title=

दुबई : आयसीसीने आज टेस्ट रँकिंग जाहीर केली आहे. ज्यामध्ये फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर भारताचा कर्णधार विराट कोहली कायम आहे. पहिल्या दहामध्ये इतर दोन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र नवव्या स्थानावर घसरला.

कोहलीने 886 गुणांसह दुसरे स्थान कायम ठेवले तर चेतेश्वर पुजाराने (766) आणि अजिंक्य रहाणेने (726) गुणांसह आठवा व दहावा क्रमांक कायम ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह एक स्थान खाली घसरला असून तो नवव्या स्थानावर आला आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाने तिसरे स्थान कायम राखले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रूट यांनी अनुक्रमे सातवे व नववे स्थान कायम राखले आहे. 

साऊथॅम्प्टन येथे अनिर्णित कसोटीनंतर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट पाचव्या क्रमांकावर कायम आहे. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड व जेम्स अँडरसनच्या अनुभवी वेगवान गोलंदाजी जोडीलाही याचा फायदा झाला.

Here's how the #WTC21 standings look after the second #ENGvPAK Test

Can England overtake Australia after the third Test? pic.twitter.com/ykUlrYSepD

— ICC (@ICC) August 18, 2020

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. भारत 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया 296, इंग्लंड 279, न्यूझीलंड 180 आणि पाकिस्तान 153 यांचा क्रमांक लागतो.