नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने न्यूझीलंडविरूद्ध आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. शिखर धवन या मालिकेत संघात परतला आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसिय मालिकेत खेळू शकला नव्हता. जलदगती गोलंदाज शारदुल ठाकूर व यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांनाही १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या संघात, के.एल. राहुल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघ झेलँड विरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने २२, २५ आणि २९ ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहेत.
कार्तिकने यावर्षी जुलै महिन्यात विंडीजविरुध्द शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कार्तिकची निवड करण्यात आली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी -२० सामन्यांमध्ये त्याला निवडण्यात आले असले होते पण अंतिम ११ मध्ये त्याला स्थान मिळाले नव्हते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी खेळण्याचा निर्णय धवनने घेतला होता. त्याची पत्नीची तब्येत खराब होती आणि तो ऑस्ट्रेलियात तिच्यासोबत होता. के. एल. राहुलला श्रीलंकेविरूद्ध खराब कामगिरीचा फटका बसला आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. उमेश व शमी देखील निवड समिती सदस्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले.
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार और शार्दुल ठाकुर