टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडे Good News! मुंबई टीमने दिली माहिती

मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांसाठी खुशखबर! टीम इंडियाचा खेळाडू होणार बाबा...

Updated: Jun 12, 2022, 10:34 AM IST
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूकडे Good News! मुंबई टीमने दिली माहिती   title=

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत गोड बातमी आहे. दिग्गज क्रिकेटपटू लवकरच गुडन्यूज देणार आहे. मुंबई इंडियन्स टीमने सोशल मीडियावर ट्वीट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमार लवकरच वडील होणार आहे. विनय कुमार अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे, मात्र तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. विनय कुमार 2020 पासून देशांतर्गत सामन्यांपासून दूर आहे. विनय कुमार त्याच्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. 2013 पासून तो टीम इंडियाकडून खेळला नाही. 

मुंबई इंडियन्स टीमने ट्वीट करून विनय कुमारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती दिली. यामुळे चाहते खूप खुश आहेत. विनय कुमार बाबा तर पत्नी रिचा सिंह आई होणार आहे. त्यांनी एक क्युट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चाहत्यांना या दोघांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत. 

विनय कुमारने टीम इंडियाकडून 1 कसोटी, 31 वन डे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. विनयने ऑक्टोबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 

विनय कुमार हे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे, तो कर्नाटककडून खेळतो. विनय कुमारची पत्नी रिचा सिंग बेंगळुरू इथे इंटिग्रिटी स्पोर्ट्स कंपनीची संचालक आहे.