मुंबई : टी 20 वर्ल्ड कप हे 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, जे यावेळी भारताऐवजी यूएईमध्ये आयोजित केले जात आहे. भारताला यावेळी टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे टी -20 वर्ल्ड कप सामना वळवण्याची आणि जिंकण्याची ताकद आहे आणि यावेळी ते भारताच्या नावे ट्रॉफी करु शकतात. त्यात भारतीय टीममधील अशा 3 खेळाडूंची नावं समोर आली आहेत, ज्यांच्यमध्ये मॅच वळवण्याची ताकद आहे.
चला अशा 3 खेळाडूंवर नजर टाकूया जे टीम इंडियाला टी -20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकवून देऊ शकतात.
रविचंद्रन अश्विन 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियासाठी निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. रविचंद्रन अश्विन भारताचा सर्वात मोठा सामना विजेता खेळाडू आहे. 2011 आणि 2015 च्या वर्ल्ड कपव्यतिरिक्त अश्विनला 2012, 2014 आणि 2016 टी -20 वर्ल्ड कप खेळण्याचा अनुभव आहे.
अश्विन 2013 आणि 2017 च्या आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धांमध्येही भारताकडून खेळला आहे. अलीकडेच अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलही खेळली.
भारतासाठी 8 आयसीसी स्पर्धांमध्ये खेळणे ही मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीत 2021 च्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताला ट्रॉफी मिळवून देण्यात अश्विन मोठी भूमिका बजावू शकतो.
अश्विननंतर हार्दिक पांड्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता ठरू शकतो. हार्दिक पंड्या 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हाही तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते, तेव्हा तुम्हाला नेहमीच अशा खेळाडूंची गरज असते जे कोणत्याही वेळी मॅच पलटण्याची क्षमता ठेवतात, त्यात जर खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही प्रकारात चांगली कामगीरी करत असेल, कर मग विषयच संपला. हार्दिक पांड्यामध्ये ही क्षमता असल्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ दाखवू शकतो अशी अपेक्षा आहे.
हार्दिक पांड्या त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये सर्वोत्तम आहे. हार्दिक त्याच्या फलंदाजीने अधिक भूमिका बजावतो, कारण जेव्हा जेव्हा भारताला जलद धावांची गरज असते, तेव्हा तेव्हा हार्दिकची बॅट देखील चालते. त्याच्याकडे गोलंदाजांविरुद्ध मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून धावा काढण्याची क्षमता आहे.
केएल राहुलची गणना टी -20 फॉरमॅटमधील सर्वात मोठ्या मॅच विनर्समध्ये केली जाते. केएल राहुलला पहिल्यांदाच टी -20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. याआधी तो भारतासाठी 2019 चा वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे.
राहुलला सलामीवीर म्हणून टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. टी 20 वर्ल्ड कप संघात राहुलचा समावेश करण्यासाठी शिखर धवनला वगळण्यात आले आहे. टी 20 वर्ल्ड कपमदरम्यान राहुल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार आहे. सलामीची जबाबदारी राहुल आणि रोहित शर्मावर असेल. केएल राहुल टी -20 वर्ल्डकपमध्ये भारतासाठी मॅच विनर सिद्ध होऊ शकतो.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
स्टँडबाय प्लेअर्स- श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.