India vs Sri Lanka 3rd T20 : टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळवण्यात येणार आहे. श्रीलंकेविरूद्धची टी-20 सिरीज टीम इंडियाने यापूर्वीच जिंकली आहे. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून श्रीलंकेच्या टीमला क्लिन स्विप देण्याची टीम इंडियाला संधी आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.
टीम इंडिया श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये 2-0 ने पुढे आहे. T20 वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाने या सिरीजमध्ये यजमान टीमचा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये पराभव केला आहे. श्रीलंकेने फलंदाजीमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मधल्या फळीतील फ्लॉप फलंदाजी.
भारताकडून यशस्वी जयस्वालवर पुन्हा एकदा चांगल्या ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नाही मात्र तरीही त्याने टीमला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. याशिवाय गोलंदाजीमध्ये रवी बिश्नोई देखील उत्तम कामगिरी करतोय. मात्र आजच्या सामन्यात रियान परागला संधी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय.
पल्लेकेले स्टेडियमच्या पीचची सुरुवात वेगवान गोलंगदाजांना काहीशी मदत मिळताना दिसते. मात्र त्यानंतर काही वेळाने फलंदाजांनाही मदत मिळू लागते. याशिवाय स्पिनर गोलंदाजांना या ठिकाणी टर्न मिळतो. तर दुसरीकडे भारत-श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. आजच्या दिवशी संध्याकाळी 55-60 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहेय
सिरीजमधील पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकले असून पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 43 रन्सने मात दिली. तर दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईसच्या नियमाने भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सिरीजनंतर टीम इंडियाला 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळावी लागणार आहे.
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत, रायन पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.