WC Points Table : भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण?

WC Points Table : ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली आणि के.एल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांच्याही उत्तम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं. तर या सामन्यानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 9, 2023, 12:14 PM IST
WC Points Table : भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर; सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? title=

WC Points Table : रविवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर वर्ल्डकपच्या स्पर्धेचा पाचवा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या टीमचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारताला 200 रन्सचं टारगेट दिलं होतं. यावेळी भारताने हे टार्गेट 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दरम्यान टीम इंडियाच्या या विजयानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये कसे मोठे बदल झाले आहेत, ते पाहूयात.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराट कोहली आणि के.एल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांच्याही उत्तम खेळीमुळे टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालं. तर या सामन्यानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत. 

टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात विजय

यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित केला जाणार असून पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला. 5 वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला नमवून टीम इंडियाने पॉईंट्स टेबलमध्ये पाचवं स्थान पटकावलं आहे. यावेळी टीम इंडियाच्या खात्यात 2 पॉईंट्स आहे. 

आयसीसी वर्ल्डकपमध्ये टीमची ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आलेली नाही. यावेळी सर्व टीम्सना एकमेकांविरुद्ध 1-1 सामने खेळायचे आहेत. प्रत्येक टीमला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. एकूण 45 ग्रुप स्टेज सामने खेळवले जाणार असून 9 पैकी 7 सामने जिंकणाऱ्या टीमला उपांत्य फेरी गाठणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे एकंदरीत टीम इंडियाला सेमीफायनल पुढील सामन्यांमध्ये चांगला खेळ करत रनरेट देखील उत्तम ठेवावं लागणार आहे.

कशी गाठणार टीम इंडिया सेमीफायनल?

पॉईंट्स टेबलवर नजर टाकल्यास न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश या टीम भारतापेक्षा पुढे आहेत. तर पाचव्या क्रमांकावर टीम इंडिया आहे. यानंतर टीमला अजून आठ सामने खेळायचे असून यामध्ये भारताचा खेळ चांगला राहिला तर सेमीफायनलमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.

न्यूझीलंडची टीम पहिल्या स्थानावर

2015 चा वर्ल्डकप आणि 2019 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या न्यूझीलंड टीमने यावर्षीही आपल्या पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी केलीये. इंग्लंडसारख्या चॅम्पियन टीमचा 9 विकेट्स राखून पराभव केला. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर, न्यूझीलंड पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर आहे. किवी टीमचं रनरेट +2 आहे.