टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली

 वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली. 

Updated: Jul 7, 2017, 09:18 AM IST
टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली title=

अँटिग्वा :  वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली. 

भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या जमैका एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाबाद १११ धावांची खेळी करून विजयश्री खेचून आणली. त्याआधी विंडीजच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचं लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवलं.  

पाहा संपूर्ण स्कोरकार्ड

कोहलीचे शतक आणि कार्तिकच्या अर्धशतकामुळे हे लक्ष्य भारतानं आठ गडी राखून गाठलं. अँटिग्वामध्ये झालेल्या चौथ्या सामान्यात भारतीय फलंदाजांकडून झालेल्या हारकीरीनं विंडीजला मालिकेत पतरण्याची संधी मिळाली. पण काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विंडीजचे फलंदाज अपयशी ठरले. 

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीनं चार तर उमेश यादवनं तीन फलंदाजांना तंबूत पाठवून प्रतिस्पर्धी संघाला २०५ धावांवर रोखलं. त्यानंतर कोहलीनं संयम आणि आक्रमकतेची उत्तम सांगड घालून भारताचा विजय सहज साध्य केला.