टीम इंडियाचा युसूफ पठाण सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त

टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांने आज सर्व क्रिकेट (Cricket) प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.  

Updated: Feb 26, 2021, 05:32 PM IST
टीम इंडियाचा युसूफ पठाण सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्त

मुंबई : भारताचा ( India) महान फलंदाज युसूफ पठाणने (Yusuf Pathan) क्रिकेटच्या ट (Cricket) सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. युसूफ भारतीय संघासाठी फार काळ कोणताही सामना खेळला नव्हता, त्यामुळे त्याने क्रिकेटला निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. युसूफ पठाणने 2007मध्ये आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती. 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी -20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात युसूफ पठाणला संघात प्रथम स्थान देण्यात आले होते. विशेष म्हणजे भारतानेही तो विश्वचषक जिंकला होता. क्रिकेटच्या इतिहासातील हे प्रथमच होते जेव्हा एखाद्या खेळाडूने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता आणि संघ जिंकला होता.

दोन विश्व चषक जिंकले

टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण (Yusuf Pathan) यांने आज सर्व क्रिकेट (Cricket) प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. (Team India's Yusuf Pathan retires from all forms of cricket) युसुफ हा भारताला दोन विश्व चषक जिंकून देणाऱ्या संघातील सदस्य आहे. तसेच तो टीम इंडियाचा माजी जलगती गोलंदाज इरफान पठाण यांचा मोठा बाऊ आहे. युसूफ पठाण याने दोन वेळा आयपीएल विजेत्या राजस्थान रॉयल संघातून खेळत होता. 2002 मध्ये आयपीएल  विजेत्या राज्यस्थान रॉयल टीमचा तो सदस्य होता. त्याने निवृत्ती जाहीर करताना कुटुंबीय, मित्र आणि चाहते तसेच टीम प्रशिक्षक, संघ आणि संपूर्ण पाठिंबा देणाऱ्या देशप्रेमींचे आभार मानले आहे. त्याने निवृत्तीबाबत ट्विट करुन ही माहिती दिली. याबाबतचे त्यांने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

2012 मध्ये खेळला शेवटचा सामना

युसूफ पठाणने मार्च 2012 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. तेव्हापासून युसूफला पुन्हा संघात स्थान मिळू शकलेले नाही. त्याने भारताकडून एकूण 57 एकदिवसीय आणि 22 टी -20 सामने खेळले, ज्यात त्याने अनुक्रमे 810 आणि 236 धावा केल्या.

37 चेंडूत शतक ठोकले होते

युसूफ पठाण आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा वेगवान फलंदाज आहे. 2010 मध्ये त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध  37 चेंडूत शतक ठोकले होते. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर असून त्याने 2012 मध्ये 30 चेंडूत शतक ठोकले होते. युसुफच्या 174 आयपीएल सामन्यांमध्ये 3204 धावा आहेत.