T20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Updated: Oct 6, 2022, 06:51 PM IST
T20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!  title=
Photo- Twitter

Team India T20 World Cup Squad: टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांची निवड न केल्याने क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागेवर संघात कोणाला स्थान मिळेल? हे स्पष्ट झालेलं नाही. टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ प्रबल दावेदार आहे. या संघात अनुभवी खेळाडू पाहता त्याचा हा शेवटचा टी 20 वर्ल्डकप असू शकतो. 

रोहित शर्मा: भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा या फॉरमॅटमधील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. 35 वर्षीय रोहित पहिल्यांदाच T20 विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. वाढत्या वयानुसार रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे सोपं नाही. अशा स्थितीत पुढील टी-20 वर्ल्डकपपूर्वी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यास आश्चर्य वाटणार नाही.

विराट कोहली: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फॉर्मात आहे. आगामी T20 विश्वचषकात कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवत चांगली कामगिरी केली नाही तर कोहली या फॉरमॅटमधून निवृत्ती घेऊ शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाकडे कोहलीच्या जागी अनेक फलंदाज आधीच आहेत. 

भुवनेश्वर कुमार: वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये किफायतशीर गोलंदाजी करण्याबरोबरच विकेट्स घेण्यातही भुवी प्रभावी आहे. पण आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तशी लय सापडली नाही. भुवनेश्वर कुमार दुखापतींमुळे संघातील स्थान डळमळीत आहे.

Indian Idol मधील या सिंगरच्या प्रेमात पडला विराट कोहली, इन्स्टाग्रामवर केलं फॉलो आणि मेसेज करत म्हणाला...

आर. अश्विन:  ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचा (R Ashwin) अनुभव आणि आकडेवारी लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने त्याला टी-20 विश्वचषकासाठी संघात समाविष्ट केले आहे.  पण त्याच्या वाढत्या वयामुळे, त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही शेवटची स्पर्धा असू शकते.

दिनेश कार्तिक: यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या स्पर्धेतील सर्वात वयस्कर भारतीय खेळाडू आहे. आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंना नेहमीच अधिक प्राधान्य मिळते. अशा परिस्थितीत हा टी-20 विश्वचषक कार्तिकसाठी शेवटचा ठरू शकतो.