इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये झाली एवढी रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे.

Updated: Jul 4, 2018, 03:37 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मॅचमध्ये झाली एवढी रेकॉर्ड title=

मॅनचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि लोकेश राहुलच्या शतकामुळे भारतानं ही मॅच ८ विकेटनं जिंकली. ३ मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं चांगली सुरुवात केल्यानंतर कुलदीप यादवच्या स्पिन बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १५९ रनवर रोखण्यात भारतीय बॉलरना यश आलं.

१६० रनचा पाठलाग करताना शिखर धवन लवकर आऊट झाला. पण लोकेश राहुल आणि रोहित शर्मानं भारताची पडझड होऊ दिली नाही. नंतर विराट कोहलीनं रन बनवून भारताला विजय मिळवून दिला. या मॅचमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. 

१ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५ विकेट घेणारा कुलदीप यादव हा पहिला चायनामन बॉलर बनला आहे. कुलदीपनं ४ ओव्हरमध्ये २४ रन देऊन ५ विकेट घेतल्या. 

२ याआधी २ भारतीय बॉलरनी टी-२० क्रिकेटमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या. युझवेंद्र चहलनं २५ रन देऊन ६ विकेट आणि भुवनेश्वर कुमारनं २४ रन देऊन ५ विकेट याआधी घेतल्या होत्या. 

३ कर्णधार विराट कोहलीनं टी-२० मध्ये सर्वात जलद २ हजार रन करण्याचा रेकॉर्ड केला आहे. कोहलीनं ६० मॅचच्या ५६ इनिंगमध्ये २ हजार रन पूर्ण केल्या. 

४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २ हजार रन करणारा कोहली चौथा बॅट्समन बनला आहे. 

५ टी-२०मध्ये लोकेश राहुलचं हे दुसरं शतक होतं. याआधी त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध शतक केलं होतं. पण त्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. 

६ लागोपाठ दोन बॉलवर स्टम्पिंग घेणारा कुलदीप हा पहिला बॉलर ठरला आहे. 

७ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये धोनीनं ३३ स्टम्पिंग केले आहेत. एवढे स्टम्पिंग घेणारा धोनी हा पहिला विकेट कीपर आहे. याआधी पाकिस्तानच्या कामरान अकमलनं ३२ स्टम्पिंग घेतले होते. 

८  टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलची सर्वाधिक सरासरी आहे. राहुलची सरासरी ५५.९२ आहे. पाकिस्तानच्या बाबार आजमची सरासरी ५५.९२ आणि विराट कोहलीची सरासरी ४९.०७ आहे.