IPL 2022 : प्लेऑफमध्ये 'या' तीन संघाचं स्थान निश्चित, चौथा संघ कोण असणार ?

आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफची (Play Off) शर्यतीत आता तीन संघाचा समावेश निश्चित मानला जातोय. यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ आधीच २० गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. 

Updated: May 17, 2022, 04:59 PM IST
IPL 2022 : प्लेऑफमध्ये 'या' तीन संघाचं स्थान निश्चित, चौथा संघ कोण असणार ?  title=

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये प्लेऑफची (Play Off) शर्यतीत आता तीन संघाचा समावेश निश्चित मानला जातोय. यामध्ये गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) संघ आधीच २० गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरलाय. तर राजस्थान (Rajsthan Royal) 
आणि लखनऊ (Lucknow Super Giants) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यात आता लीग फेरीचे फक्त 6 सामने बाकी आहेत. या सामन्यातून प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानावर कोणता संघ असणार हे कळणार आहे.  

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royal) संघाचा रनरेट चांगला आहे. त्यात रविवारी राजस्थानने लखनौचा पराभवही केलेला. आरसीबीचा रन रेट मायनसमध्ये आहे. आता राजस्थानचा शेवटचा सामना 20 मे रोजी चेन्नईसोबत होणार आहे. चेन्नईकडून राजस्थानचा मोठा पराभव झाला तरच त्याचा नेट रनरेट लखनौ आणि आरसीबीच्या खाली येईल. त्याचवेळी आरसीबीच्या संघाने गुजरातचा 70 हून अधिक धावांनी पराभव केला.
 
लखनऊ सुपर जायंट्स:

 लागोपाठच्या पराभवांमुळे लखनऊचा (Lucknow Super Giants)रन रेट घसरलाय. पण तरीही रनरेट प्लसमध्ये आहे. उद्या 18 मे रोजी कोलकत्ता विरूद्ध  जवळपास 80 धावांनी पराभव झाला तरच संघ टॉप-3 च्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. दुसरीकडे, आरसीबीच्या संघाने गुजरातचा 70 धावांनी पराभव केला पाहिजे.

दिल्ली कॅपिटल्स: 

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) रन रेट प्लसमध्ये आहे. त्याचे सध्या 13 सामन्यांत 14 गुण आहेत.  21 मे रोजी दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. जर संघाने हा सामना जिंकला तर त्याचे 16 गुण होतील आणि धावगती वाढेल. पण जर हा सामना गमावला आणि आरसीबी संघाने गुजरातला पराभूत केले तर दिल्लीचा संघ बाद होईल. शेवटच्या सामन्यात दोन्ही संघ हरले तर 14 गुण असलेले संघ शर्यतीत येऊ शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Banglore) संघाने आतापर्यंत 13 पैकी 7 सामने जिंकलेत. पण संघाचा रनरेट मायनसमध्ये आहे. अशा स्थितीत शेवटचा सामना जिंकूनही त्याचे प्लेऑफमधील स्थान  मिळवणे अवघड आहे. दिल्लीचा संघ जिंकला तर आरसीबीच्या टीमला पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल. यावर्षी सुद्दा आयपीएलचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगणार आहे.