Manoj Tiwary On Domestic Cricket Umpiring: नुकतंच टीम इंडियाचा क्रिकेटर मनोज तिवारी ( Manoj Tiwary ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिवारीच्या निवृत्तीनंतर मनोज ( Manoj Tiwary ) सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होता. निवृत्तीनंतर मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) अनेक धक्कादायक खुलासे केले. यानंतर आता त्याने अंपायरबाबत देखील एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा तिचं नाव चर्चेत आहे.
मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) देशांतर्गत क्रिकेटच्या 'अंपायरिंग'वर मोठा खुलासा केला आहे. मनोजने सांगितलं की, अनेकदा अंपायर दारूच्या नशेत मैदानात येतात. खेळाडूंसोबत अंपायरचीही 'डोप टेस्ट' व्हायला हवी. एखाद्या खेळाडूची डोप चाचणी झाली तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायरपर्यंत जायला हवी. मी अनेकदा पाहिलंय की, अंपायर नशेत मैदानात येतात आणि ते झोपलेले दिसतात. योग्यरित्या काम करण्यासाठी ते कसे सक्षम असतील?
मनोजने ( Manoj Tiwary ) म्हटलंय की, "ज्यावेळी मी त्यांना विचारलं, सर, काल रात्री तुमच्याकडे काय होतं? त्यावेळी मला उत्तर मिळालं होतं की, 'मला ऑन द रॉक्स व्हिस्की आवडते.' यानंतर ते हसले. मला वाटतं की, प्रत्येक सिझन सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने अंपायरचे कान आणि डोळे तपासले पाहिजेत.
"माझ्यासाठी अंपायरिंग हा मुळात प्रमुख चिंतेचा विषय आहे. सर्व योग्य सन्मानाने, पण देशांतर्गत क्रिकेटमधील अंपायरिंगचा दर्जा खालावत चाललाय असं मला वाटतंय. बीसीसीआयने त्यात सुधारणा कशी करता येईल याचा विचार करायला हवा. ही एक-दोन वर्षांची नाही तर मी मी अनेक वर्षांपासून पाहतोय. यामध्ये खूप मोठ्या चुका होतात," असंही मनोज तिवारीने ( Manoj Tiwary ) म्हटलं आहे.
बंगालचा कर्णधार मनोज तिवारी ( Manoj Tiwary ) याने ईडन गार्डन्स मैदानावर बिहारविरूद्ध (Bihar vs Bengal) अखेरचा सामना खेळला. यानंतर त्याने निवृत्ती घोषित केली. त्यावेळी तो म्हणाला, मी खूप आनंदी आहे की, मला माझ्या कारकिर्दीचा अखेरचा सामना माझ्या आवडत्या मैदानावर खेळायला मिळाला आणि मी येथेच निवृत्त झालो. फक्त दुःख एका गोष्टीचं आहे की, मी बंगालसाठी रणजी ट्रॉफी जिंकू शकलो नाही आणि या गोष्टीचे मला दुःख वाटत राहील.