दिल्ली : गेल्या वर्षी टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदावरून विराट कोहलीला हटवल्यामुळे सध्या खूप चर्चा होतेय. अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत विराट कोहली कॉर्न विकताना दिसतोय. हा फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्सला मोठा धक्का बसला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर यूजर्स विविध कमेंट्स करून मजा घेताना दिसतायत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला एका गाडीवर मके विकताना दिसतोय. हा व्यक्ती हुबेहूब विराट कोहली सारखा दिसतो. या व्यक्तीचा चेहरा विराट कोहलीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जातोय. हा फोटो शेअर करत सोशल मीडिया यूजर्स मीम्स बनवून आनंद घेतायत.
@dhaikilokatweet या युजरने ट्विटरवर हा फोटो पहिल्यांदा शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्याला एक गंमतीशीर कॅप्शन दिलं आहे. यानंतर अनेक यूजर्सने हा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो समोर आल्यानंतर तो सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
1500 रूपिये अधिक मिलने पर छोड़ा पूमा का साथ, पहना एड़िदास का टोपा.. pic.twitter.com/i87o6QNHeM
— Arun Lol (@dhaikilokatweet) December 31, 2021
दरम्यान फोटो शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'काय वेळ आली होती कोहली तुझ्यावर, जे तु मके विकायला सुरुवात केलीस.' तर एका यूजरने लिहिले की, 'हे एक चांगला फोटो आहे, ही व्यक्ती हुबेहुब कोहलीसारखी दिसते.' 'फोटो पाहून हे सांगणं कठीण आहे की हा खरा कोहली नाही,' असंही एकाने कॅप्शनमध्ये म्हटलंय.
हा फोटो नेमका कुठला आहे आणि या व्यक्तीचं खरं नाव काय आहे हे सध्या तरी कळू शकलेलं नाही. आम्हीही या फोटोच्या सत्यतेचा दावा करत नाही.