नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी स्टम्पमागे एवढा अॅक्टीव्ह असतो की बॅट्समनला सेकंदातील काही अंशही विचार करण्याची संधी मिळत नाही. याची प्रचिती वेळोवेळी आपल्याला येत असते. धोनीची बॅटींग बघण्याइतकेच स्टंम्पिंग बघणही रोमांचकारी असत. आयपीएलमध्येही असे काही क्षण आपल्याला दिसले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ग्लेन मॅक्सवेलची विकेट घेतानाचा क्षण अविस्मरणीय असा होता. धोनीची स्टंम्पिंग एवढी फास्ट होती की मॅक्सवेलला वळण्याची संधीही मिळू शकली नाही.
जर बॉल धोनीच्या हातात आहे आणि खेळाडू क्रीझच्या बाहेर आहे तर फलंदाज निराश झालाच म्हणून समजा हे टीम इंडियातल्या प्रत्येकाला माहीत आहे.धोनीची ही स्टँपिंगही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आयपीएल,आंतरराष्ट्रीय सामने अशा सगळीकडेच धोनी यष्टीरक्षणासाठी ओळखला जातो. एका सेकंदापेक्षाही कमी वेळात धोनीने बेल्स उडललेल्या आपण पाहिल्या असतील. हे पाहून कोणीही हैराण होईल. प्रत्येक फॉर्मेटमध्ये त्याची किंपिंग जबरदस्त होत असलेली आपण पाहतो.
MS Dhoni Best Stumpings @msdhoni pic.twitter.com/pKYqNOHGx9
— Chandra (@ImChandraM) August 12, 2017
धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० हून अधिक स्टंम्पिंग केली आहे. या माजी भारतीय कर्णधाराने आतापर्यंत ३०३ सामन्यांमध्ये १०२ शतक केले आहेत. धोनी जोपर्यंत खेळेल त्याची ही चमक दिसेलच आणि सर्वांचे मनोरंजन होईल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.