नाद करा पण अर्शदीपचा कुठं! पॉवरप्लेमधील एक ओव्हर अन् आफ्रिकेच्या बत्त्या गुल Video

अर्शदीप आणि चहर या जोडीने मोडलं आफ्रिकेचं कंबरडं, पाहा व्हिडीओ

Updated: Sep 28, 2022, 08:25 PM IST
नाद करा पण अर्शदीपचा कुठं! पॉवरप्लेमधील एक ओव्हर अन् आफ्रिकेच्या बत्त्या गुल Video  title=

झी मीडिया, हरिश मालुसरे, Ind vs Sa :  दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या टी20 सामन्यात टॉस जिंकत टीम इंडियाने आफ्रिकेच्या संघाची दाणादाण उडवली आहे. दक्षिण आफ्रिका प्रथम बॅटींग करताना सुरूवातीला पॉवरप्लेमध्ये जोरदार बॅटींग करतील असं वाटत होतं.(Arshdeep Singh takiing 3 wickets video) मात्र युवा गोलंदाज अर्शदीप सिंगच्या आक्रमक माऱ्यापुढे आफ्रिकन संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. (Trending Ins vs Sa T20 match Arshdeep Singh takiing 3 wickets video sport marathi news)

पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरने कर्णधार टेम्बा बावुमाला शून्य धावसंख्येवर माघारी पाठवलं. मात्र त्यानंतर दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीपने कहर केला. IPL मध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणाऱ्या अनुभवी क्विंटन डिकॉकच्या दांड्या गुल केल्या, पाचव्या चेंडूवर रूसो आणि सहाव्या चेंडूवर घातक डेव्हिड मिलरलाही बोल्ड आऊट केलं. 

 

आधीच 4 विकेट्स गेलेल्या असताना दीपक चहरने आफ्रिकेला पाचवा धक्का दिला. ट्रिस्टन स्टब्सला कॅच आऊट केलं.  तो कॅचही अर्शदीपने घेतला होता. अर्शदीपच्या घातक स्पेलने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. आफ्रिकेचे आघाडीचे आणि खंदे प्लेअर आऊट झाल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी अडचण होणार आहे. 

पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने चार महत्वपुर्ण बदल केले आहेत.अर्शदीप सिंग, दीपक चहर, ऋषभ पंत आणि आर अश्विन या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे कर्णधार टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केलं आहे. टेंबा बावुमा जखमी झाला होता. विश्वचषकाच्या दृष्टीने बावुमासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.