VIDEO : धोनीचे हे हेलिकॉप्टर सिक्स पाहून म्हणाल, ‘ये हाथ हमका दे दे धोनी’!

महेंद्र सिंह धोनी याने धर्मशाला येथे झालेल्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्याच्या हातात आणि बॅटमध्ये किती शक्ती आहे.

Updated: Dec 11, 2017, 04:22 PM IST
VIDEO : धोनीचे हे हेलिकॉप्टर सिक्स पाहून म्हणाल, ‘ये हाथ हमका दे दे धोनी’! title=

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी याने धर्मशाला येथे झालेल्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्याच्या हातात आणि बॅटमध्ये किती शक्ती आहे. एकीकडे टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी केवळ ११२ रन्स केले तर एकट्या धोनीने ६५ रन्स करून टीमला मोठा स्कोर करता आला. त्याशिवाय त्याचे दोन सिक्सरही सर्वांचे आकर्षण ठरले.

धोनीने लाजिरवाण्या स्थितीतून वाचवले

जर टीम इंडियाच्या या निराशाजनक प्रदर्शनावेळी धोनीने आपला रंग दाखवला नसता तर त्याची काय हालत झाली असती याचा विचार करा. धोनी सोडून संपूर्ण टीम इंडियाने केवळ ४७ रन्स केलेत. यातील चार खेळाडू तर एकही रन करु शकले नाही.  

दोन अस्मानी सिक्सर

धोनीने या पराभूत झालेल्या खेळातही आपल्या बॅटींगने आणि फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने अर्धशतकीय खेळी करून टीमला लाजिरवाण्या स्थितीतून बाहेर काढले. पण तरीही सामना जिंकता आला नाही. त्याने त्याच्या या खेळीत अनेक रेकॉर्ड केले. पण त्याच्या या खेळीत सर्वात खास होते त्याने लगावलेले दोन अस्मानी सिक्सर.  

टीकाकारांना सडेतोड उत्तर

धोनीने ६५ रन्सच्या खेळीत १० फोर आणि २ सिक्सर लगावले. या खेळीतून त्याने त्याच्या निवॄत्तीची मागणी करणा-यांनाही सडेतोड उत्तर दिलं आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरूद्धच्या दुस-या टी-२० सामन्यात झालेल्या पराभवानंतर काही माजी खेळाडूंनी धोनीचा पर्याय शोधण्याचं वक्तव्य केलं होतं. पण त्याने त्याच्या या खेळीतून त्याचा आशा स्पष्ट केल्या आहेत. 

धमाकेदार फटकेबाजी

धोनीने पहिला सिक्सर नुवान प्रदीपच्या बॉलवर ३५व्या ओव्हरमध्ये लगावला. हा सिक्सर लगावून धोनी ४६ च्या वयैक्तिक स्कोरवर पोहोचला. नंतर अर्धशकत पूर्ण होताच त्याने दुसरा सिक्सर लगावला. आता त्याचा स्कोर ५७ झाला होता. ३८व्या ओव्हरमध्ये बॉल तिस-यांदा बाऊंड्रीच्या बाहेर पाठवत त्याने ६५ रन्स केले आणि आऊट झाला.