VIDEO: 'या' बॅट्समनने दुसऱ्या मॅचमध्येही केला लाजीरवाणा रेकॉर्ड

या प्लेअरने पहिल्या मॅचमध्ये केलेली चूक पुन्हा दुसऱ्या मॅचमध्येही केली.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 11, 2017, 04:23 PM IST
VIDEO: 'या' बॅट्समनने दुसऱ्या मॅचमध्येही केला लाजीरवाणा रेकॉर्ड
File Photo

नवी दिल्ली : धरमशाला वन-डे मॅचमध्ये जसप्रीत बुमराह याने नो-बॉल टाकत पाकिस्तानविरोधात केलेली चूक पुन्हा एकदा केली. त्यामुळे अनेकांनी बुमराहवर जोरदार टीकाही केली. मात्र, वेस्ट इंडिजच्या एका प्लेअरने पहिल्या मॅचमध्ये केलेली चूक पुन्हा दुसऱ्या मॅचमध्येही केली.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

सध्या वेस्टइंडिजची टीम यावेळी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडच्या टीमने पहिली टेस्ट मॅच एक इनिंग आणि ६७ रन्सने जिंकली. दुसऱ्या मॅचमध्येही वेस्ट इंडिजच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पहिल्या मॅचमध्ये झाला हिट विकेट

वेस्ट इंडिजच्या सुनील अंबरीश याने आपल्या टेस्ट करिअरची पहिली मॅच न्यूझीलंडविरोधात खेळली. या मॅचमध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी मैदानात उतरलेला सुनील अंबरीश पहिल्याच मॅचमध्ये हिट विकेट झाला.

हिट विकेट होण्याचा रेकॉर्ड 

पहिल्या मॅचमध्येच सुनील अंबरीश हिट विकेट झाला. यासोबतच क्रिकेटच्या इतिहासात डेब्यू मॅचमध्ये शून्यावर हिट विकेट होण्याचा रेकॉर्डही त्याने आपल्या नावावर केला.

दुसऱ्या मॅचमध्येही हिट विकेट

पण इतकचं नाही तर सुनील अंबरीशने दुसऱ्या मॅचमध्येही पुन्हा तिच चूक केली. दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही सुनील अंबरीश हिट विकेट झाला.

न्यूझीलंडच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये ३७३ रन्स केले. यानंतर मैदानात उतरलेली वेस्ट इंडिजची संपूर्ण टीम केवळ २२१ रन्सवर आऊट झाली.