द्रविडच्या चेल्यांनी घेतला विराट सेनेच्या पराभवाचा बदला

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या पराभवाचा बदला भारताच्या अंडर १९ संघाने न्यूझीलंडमध्ये घेतला.

Updated: Jan 9, 2018, 02:44 PM IST
द्रविडच्या चेल्यांनी घेतला विराट सेनेच्या पराभवाचा बदला title=

ख्राईस्टचर्च : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या पराभवाचा बदला भारताच्या अंडर १९ संघाने न्यूझीलंडमध्ये घेतला.

सोमवारी केपटाऊनमध्ये विराट अँड कंपनीला पहिल्या कसोटीत ७२ धावांनी मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. सोमवारी या पराभवाच्या जखमेवर मंगळवारी भारताच्या ज्युनियर संघाने मलम लावले. भारताच्या अंडर १९ टीमने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर १९ टीमला १८९ धावांनी हरवले. 

न्यूझीलंडमध्ये अंडर १९ वर्ल्डकप खेळवण्यात येत आहे. यासाठी सर्व संघ तेथे पोहोचलेत. मंगळवारी टीम इंडिया आणि द. आफ्रिका यांच्यात वॉर्मअप मॅच खेळवण्यात आली. 

टीम इंडियाचे प्रतिनिधित्व पृथ्वी शॉ करतोय. तर त्यांचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. या सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ३३२ धावा केल्या. या सामन्यात भारताने १८९ धावांनी विजय मिळवला.

१३ जानेवारीपासून वर्ल्डकपला सुरुवात होतेय. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय.