बुमराहपेक्षाही घातक यॉर्कर... हवेत बेल्स उडाल्या आणि श्रेयस अय्यर पाहातच राहिला, व्हिडीओ

आनंद पोटात माझ्या माईना | घातक यॉर्करनं अय्यरची दांडी गुल, कोचनं स्टेडियममध्ये आनंदाच्या भरात काय केलं पाहा व्हिडीओ  

Updated: Apr 16, 2022, 11:50 AM IST
बुमराहपेक्षाही घातक यॉर्कर... हवेत बेल्स उडाल्या आणि श्रेयस अय्यर पाहातच राहिला, व्हिडीओ title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात बुमराहपेक्षाही घातक बॉलरचा जलवा पाहायला मिळाला. कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यात त्याने घातक यॉर्कर टाकून श्रेयस अय्यरची दांडी गुल गेली. त्याचा यॉर्कर एवढा घातक होता की 2 सेकंद श्रेयसलाही कळलं नाही की आपण क्लीन बोल्ड झालो. 

आयपीएलच्या 15 व्या हंगामात घातक यॉर्कर किंग उमरान मलिकचा जलवा पाहायला मिळत आहे. त्याने बॉलिंग खूप चांगली केली. त्याचं जगभरात कौतुक होत आहे. त्याने 27 धावा देऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. 

उमरानच्या एका यॉर्करवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला. त्याच्या डोळ्यादेखत बेल्स हवेत उडाल्या. शॉट खेळण्याच्या नादात कधी आऊट झाला कळलंच नाही. उमराननं 149 किमी प्रति तासाच्या वेगानं हा यॉर्कर बॉल टाकला होता. 

उमरानची कामगिरी पाहून बॉलिंग कोच डेल स्टेन तर स्टेडियममध्ये आनंदाने साजरा करायला लागले. ते आपल्या जागेवरून उठले त्यांनी बसलेल्या खेळाडूंची पाठ थोपटली आणि आनंद साजरा केला. बॉलिंग कोचचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आयपीएलमधील उमरानची कामगिरी पाहता त्याला टीम इंडियामध्ये टी 20 वर्ल्ड कपसाठी खेळण्याची संधी मिळू शकते असं भाकीत अनेक दिग्गजांनी केलं आहे. त्याच्या कामगिरीचं चिज टीम इंडियामध्ये संधी मिळून होणार का? हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.