INDW vs ENGW: शेफाली वर्मा रचणार का इतिहास? कुठे दिसणार फायनलचा सामना, पाहा...

टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हा मोठा सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हा सामना कुठे टेलिकास्ट होणार आहे. 

Updated: Jan 29, 2023, 01:52 PM IST
INDW vs ENGW: शेफाली वर्मा रचणार का इतिहास? कुठे दिसणार फायनलचा सामना, पाहा... title=

INDW vs ENGW: आयसीसी अंडर-19 महिला वर्ल्डकपचा सामना आज रंगणार आहे. भारत विरूद्ध इंग्लंड (INDW vs ENGW) असा फायनलचा सामना रंगणार आहे. सेनवेस पार्क स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून दोन्ही टीम्समध्ये मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी हा मोठा सामना रंगणार आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हा सामना कुठे टेलिकास्ट होणार आहे. 

INDW vs ENGW: वर्ल्डकप जिंकण्यापासून टीम इंडिया केवळ एक पाऊल दूर

अंडर-19 भारतीय महिला क्रिकेट वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेत खेळला जातोय. यामध्ये टीम इंडिया चांगल्या लयीत दिसून येतेय. भारतीय महिलांना ग्रुप राऊंडचे सर्व सामने जिंकले असून टीम टॉपवर राहिली होती. त्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यात न्यूझीलंडच्या महिलांना धूळ चारली आणि फायनलच्या सामन्याचं तिकीट पटकावलं. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचं पारडं जड दिसून येतेय.

कुठे होणार भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील फायनलचा सामना

भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यातील फायनलचा सामना 29 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. विश्वविजेता ठरवणारा हा सामना पोचेफस्ट्रूमच्या सेनवेस पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. 

किती वाजता सुरु होणार फायनलचा सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 वर्ल्डकपचा फायनल सामना संध्याकाळी 05:15 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी म्हणजेच 04:45 वाजता टॉस होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 वर्ल्डकप सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठे होणार आहे?

भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यातील अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे दिसणार?

फॅनकोड अॅपवर हा सामना तुम्ही लाईव्ह पाहू शकता.