कोलकाता : क्रिकेट हा खेळ जितका मनोरंजक आणि मजेदार आहे तितकाच खतरनाकही आहे. एका बॉलमध्ये कधी काय होईल हे कोणचं सांगू शकत नाही.
क्रिकेटच्या मैदानात कधी वाद होतात तर कधी बॉल लागून क्रिकेटर जखमी होतो. असाच एक प्रकार शुक्रवारी घडला आणि भारतीय क्रिकेटर थोडक्यात बचावला.
शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये ग्रुप-डीसाठी खेळण्यात येणाऱ्या मॅचमध्ये विदर्भाचा बॅट्समन आदित्य सरवटे हा थोडक्यात बचावला आहे. बंगाल क्रिकेट अकादमी मैदानात सुरु असलेल्या मॅचमध्ये आदित्य सरवटे बॅटींगसाठी मैदानात उतरला.
आदित्य ६० रन्स करुन मैदानात चांगलं प्रदर्शन दाखवत होता. मात्र, त्याच दरम्यान बॉल त्याच्या थेट डोक्याला लागला. सुदैवाने आदित्यला मोठी दूखापत झाली नाही.
बॉल लागल्यानंतर आदित्यने मैदाना सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, थोड्यावेळाने आदित्य पून्हा मैदानात परतला. आदित्यने ९३ बॉल्समध्ये ८९ रन्स बनवले. ८९ रन्सवर असताना आदित्य कॅच आऊट झाला.
बंगालसोबत खेळण्यात येणाऱ्या या मॅचमध्ये विदर्भाने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये सर्व विकेट्स गमावत ४९९ रन्स केले. विदर्भाच्या ओपनर जोडीने पहिल्या विकेटसाठी २५९ रन्सची पार्टनरशीप केली. फैज फजलने १४२ आणि संजय रामास्वामीने १८२ रन्स केले.
विदर्भाच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगालच्या टीमची सुरुवात खराब झाली. केवळ एका रनवरच बंगालच्या टीमचा पहिला विकेट गेला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर बंगालच्या टीमने ३ विकेट्स गमावत ८९ रन्स केले होते. कॅप्टन मनोज तिवारीने ३६ आणि कौशिक घोष १ रनवर खेळत होते.