Video: विजयाचा उन्माद? भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला

आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला.

Updated: Sep 20, 2018, 06:57 PM IST
Video: विजयाचा उन्माद? भारतीय खेळाडूनं तलवारीनं केक कापला

दुबई : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानवर ८ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर भारतीय टीमनं केलेलं सेलिब्रेशन वादाच्या भोवऱ्यात येऊ शकतं. या विजयानंतर हॉटेलमध्ये परतलेल्या भारतीय टीमसाठी केक ठेवण्यात आला होता. या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या भुवनेश्वर कुमारनं केक कापला. हा केक कापण्यासाठी भुवनेश्वर कुमारला तलवार देण्यात आली. भुवनेश्वर कुमारनं तलवारीनंच हा केक कापला. तलवारीनं केक कापतानाच्या या व्हिडिओमध्ये धोनी आणि रोहित शर्माही दिसत आहेत. या केकवर 'Congratulations' असं लिहिण्यात आलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@mahi7781 @rohitsharma45 Celebrations after Victory ! #INDvPAK #asiacup2018

A post shared by M S Dhoni (@dhoni07.fc) on

या मॅचमध्ये पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारतीय बॉलरनी शानदार बॉलिंग करत पाकिस्तानचा १६२ रनवर ऑल आऊट केला. भुवनेश्वर कुमारनं ७ ओव्हरमध्ये १५ रन देऊन ३ विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.

इंग्लंड दौऱ्यावेळी भुवनेश्वरला दुखापत

आशिया कपमधून भुवनेश्वर कुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. भुवनेश्वरची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती पण दुखापतीमुळे दौरा अर्धवट सोडून त्याला परतावं लागलं. इंग्लंड दौऱ्यामध्ये भुवनेश्वर कुमार फक्त ३ वनडे आणि १ टी-२० मॅच खेळू शकला.