VIDEO: क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात कुत्र्याची एन्ट्री, बॉल घेऊन पळाला

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Sep 12, 2021, 07:59 PM IST
VIDEO: क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात कुत्र्याची एन्ट्री, बॉल घेऊन पळाला title=

मुंबई : क्रिकेट जगतात अनेक वेळा अशा घटना समोर येतात ज्यामुळे चाहत्यांना हसायला भाग पडते. अलीकडेच, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत (IND vs ENG टेस्ट मालिका), जार्वो नावाच्या व्यक्तीने परवानगीशिवाय मैदानात प्रवेश करण्याचे धाडस केले. आता आणखी एक पिच इन्व्हेडर हेडलाईन्समध्ये आहे.

आयर्लंडमधील महिला क्रिकेट सामन्यादरम्यान एक कुत्रा मैदानात शिरला. त्याने चेंडू तोंडात उचलला आणि मैदानात धावू लागला. सीएसएनआय आणि ब्रॅडी क्रिकेट क्लब यांच्यातील सामना सुरू असताना हे दृश्य पाहायला मिळाले. कुत्र्याच्या गळ्यात पट्टाही बांधलेला होता.

सीएसएनआय क्रिकेट क्लबच्या डावाच्या 9 व्या षटकादरम्यान ही घटना घडली. जेव्हा फलंदाज  अब्बी लेकी (Abbi Leckey) विकेटकीपरच्या मागे शॉट खेळला. तेव्हा बॉल शॉर्ट थर्ड-मॅनवर उभी असलेल्या एका खेळाडूने उचलला. बोल थ्रो करताच मैदानावर कुत्रा शिरला.

ब्रॅडी संघाची यष्टीरक्षक राहेल हेपबर्नने बॉल पकडला आणि स्टम्प उडवण्याचा प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली, तेव्हाच कुत्र्याने आपली क्षेत्ररक्षण प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. त्याने दाताने चेंडू उचलला आणि धावला. हे पाहून सर्वांनाच हसू अनावर झाले.

मग स्टेडियममध्ये उपस्थित असलेला एक चाहता जमिनीवर धावला, बहुधा तो कुत्र्याचा मालक होता.