VIDEO: युसूफचं शतक झाल्यावर इरफानचा जल्लोष

रणजी ट्रॉफीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात बडोदा टीम मध्यप्रदेश टीम विरूद्ध डगमगल्याचे दिसले होते. पहिल्या खेळीत बरेच रन्स देऊन बडोदाने त्यांचा टॉप ऑर्डर गमावला होता आणि त्यांच्यावर फॉलोऑनची वेळ आली होती.

Updated: Oct 13, 2017, 03:37 PM IST
VIDEO: युसूफचं शतक झाल्यावर इरफानचा जल्लोष title=

नवी दिल्ली : रणजी ट्रॉफीच्या आपल्या पहिल्याच सामन्यात बडोदा टीम मध्यप्रदेश टीम विरूद्ध डगमगल्याचे दिसले होते. पहिल्या खेळीत बरेच रन्स देऊन बडोदाने त्यांचा टॉप ऑर्डर गमावला होता आणि त्यांच्यावर फॉलोऑनची वेळ आली होती.

पण त्यानंतर पठाण बंधूनीं आपल्या टीमसाठी संकट मोचन बनून दमदार बॅटींग केली. त्यानी पाचव्या विकेटसाठी १८८ रन्सची भागीदारी केली. 

या खेळीत नंतर बडोदा टीममध्ये परतीची आशा जागी झाली. बडोदा टीम ३०२ रन्स करून ऑल आऊट झाली. यूसुफ पठाणने सर्वात जास्त १२५ बॉल्समध्ये १११ रन्स केले. तेच इरफारने त्याची चांगली साथ दिली. त्याने ८० रन्स केले. यादरम्यान यूसुफने त्याचं शतक पूर्ण केल्यावर या दोन भावांचं प्रेमही प्रेक्षकांना मैदानात बघायला मिळालं. 

इरफान त्याच्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियात एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, युसूफ पठाण बॅटींग करत आहे आणि इरफान नॉन स्ट्राईकर साईडला आहे. युसूफने शतक पूर्ण केलं आणि तिकडे इरफान जल्लोष करू लागला. इरफान भावाच्या शतकामुळे इतका आनंदी झाला की, बॅट तिथेच सोडून तो युसूफकडे धावत गेला.