VIDEO : 'ती'नं ठोकला असा सिक्सर की स्कोअरबोर्डच कोसळला...

  'आयसीसी महिला चॅम्पियन' दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला ६० रन्सनं हरवलं. परंतु, या मॅचमध्ये पूजा वस्त्राकर आपल्या एका शॉटमुळे चर्चेत आलीय. 

Updated: Mar 16, 2018, 09:20 AM IST
 VIDEO : 'ती'नं ठोकला असा सिक्सर की स्कोअरबोर्डच कोसळला...  title=

मुंबई :  'आयसीसी महिला चॅम्पियन' दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला ६० रन्सनं हरवलं. परंतु, या मॅचमध्ये पूजा वस्त्राकर आपल्या एका शॉटमुळे चर्चेत आलीय. 

पूजा वस्राकर ३ रन्स बनवून स्ट्रायकर एन्डवर होती आणि बॉल जेस जोनासेनच्या हातात होता. पूजानं या बॉलवर सिक्सर छोकला आणि बॉल सरळ बाऊंन्ड्रीवर लावलेल्या स्कोअरबोर्डला जाऊन भिडला. त्यावर लागलेले अंक जमिनीवर कोसळले. 

हे पाहून बॉलर जोनासेनलाही हसू आलं... आणि दर्शकांनीही या सिक्सरचा जोरदार आनंद लुटला. 

 

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं प्लेअर ऑफ द मॅच निकोल बोल्टन (८४), एलिस पॅरी (७०) आणि बॅथ मूनी (५६) यांच्या जोरावर भारतासमोर २८८ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय महिला टीम मात्र ४९.२ ओव्हर्समध्ये २२७ रन्सवर ऑल आऊट झाली.