नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांच्यातील द्वंद्वता साऱ्या जगाला माहित होती.मॅकग्राबद्दल सचिनविरोधात मैदान आणि मैदानाबाहेर वक्तव्य केली. पण सचिनने आपल्या फलंदाजीनेच त्याला जशास तसे उत्तर दिले. अशी एक घटना ऑक्टोबर २००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान घडली.
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या या सामन्यात सचिनने केवळ ३८ रन्स केले पण मॅग्राच्या बॉलिंगला मारलेले सिक्सर चाहत्यांची मने जिंकणारे होते. मॅग्राची धुलाई करण्यामागे एक कहाणी आहे. चॅंपियन्स ट्रॉफीच्या सामन्यापूर्वी, टीम इंडिया तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर गेली होती. यावेळी टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब झाली होती. संपूर्ण मालिकेत तेंडुलकरची सर्वोत्तम धावसंख्या १८ एवढीच होती. त्यानंतर टीकाकार तसेच मॅग्राने सचिनवर खूप तोंडसुख घेतले.
ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर सचिनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. टीम इंडियाची कमान सौरव गांगुलीने संभाळली. काही दिवसांनी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होता. गांगुली आणि तेंडुलकर यांनी खेळाची सुरूवात केली. नेहमी संयमी खेळी करणाऱ्या सचिनचा वेगळा आक्रमक अंदाज सुरूवातीपासून पाहायला मिळाला. मॅकग्राच्या दुसर्या आणि तिसऱ्या षटकात त्याने दोन षटकार ठोकले.
#ChampionsTrophy - Sachin Tendulkar v Glenn McGrath, Nairobi 2000
RT if you remember this !
Video - Sky Sports & ICC pic.twitter.com/KRpWt5GcNQ
— Cricketopia (@CricketopiaCom) May 29, 2017
तिसऱ्या षटकात तर सचिनने क्रीजबाहेर पाऊल टाकत बॉल सीमापार केला.ऑस्ट्रेलियात मिळालेल्या अपमानाचा सचिनने बदला घेतल्याचे यावेळी बोलले गेले. या डावात सचिनने ३७ चेंडूत ३८ रन्स काढल्या. यामध्ये त्यांनी तीन चौकार व तीन षटकार मारले. त्यातील दोन षटकार आणि दोन चौकार तर त्याने मॅग्रालाच लगावले.