Video : 'भाई उर्वशी बुला रही है!' तिचं नाव ऐकताच पंतची काय अवस्था पाहा...

Urvashi Rautela : यंदाचं टी20 वर्ल्डकप अनेक कारणांमुळे चर्चेत आलं. पण एक खेळाडून मैदानाबाहेर सोशल मीडियावर जास्त चर्चेत होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत ( Rishabh Pant)...उर्वशीच्या नावाने चाहत्यांनी त्याला हैराण करुन सोडलं.   

Updated: Nov 8, 2022, 10:32 AM IST
Video : 'भाई उर्वशी बुला रही है!' तिचं नाव ऐकताच पंतची काय अवस्था पाहा... title=
video t20 world cup fans tease rishabh pant with urvashi rautela name nmp

T20 World Cup : Fans tease Rishabh Pant with Urvashi Rautela's name : गुरुवारी 10 नोव्हेंबरला T20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सेमीफायनल (India vs England semi final 2022) रंगणार आहे. यंदाचं टी20 वर्ल्डकप अनेक कारणांमुळे चर्चेत आलं. पण एक खेळाडून मैदानाबाहेर सोशल मीडियावर जास्त चर्चेत होता. हा दुसरा तिसरा कोणी नसून ऋषभ पंत ( Rishabh Pant)...उर्वशीच्या नावाने चाहत्यांनी त्याला हैराण करुन सोडलं. 

'भाई उर्वशी बुला रही है!'

भारतीय विकेटकीपर ऋषभ पंतसाठी हे टी20 वर्ल्डकप फार चांगलं राहिलं नाही. त्याचा जास्त जास्त वेळ मैदानाबाहेर गेला आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बाउंड्रीजवळून चालत असताना पंतला प्रेक्षकामधून एकाने अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या (Urvashi Rautela) नावाने चिडवलं. तो म्हणाला की, 'भाई उर्वशी बुला रही है!' त्यावर पंतने भन्नाट उत्तरं दिलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (video t20 world cup fans tease rishabh pant with urvashi rautela name nmp)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by COUPLESOCIETTY (@couplesocietty)

उर्वशीच्या नावाने अनेक वेळा चाहते खेचतात टांग 

उर्वशी ही ऋषभ पंतची मैत्रीण आहे. या दोघांच्या नात्यासंबंधात गेल्या दोन महिन्यात अनेक बातम्या समोर आल्या. कधी उर्वशी पंतला टोमणे मारताना तर कधी ऋषभ त्याला उत्तर देताना दिसली. पंत टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी उर्वशीही तिथे गेली होती. त्यामुळे चाहत्यांनी ऋषभची टांग खेचायला सुरुवात केली. सोशल मीडियावर उर्वशी-पंतवरुन अनेक मीम्सदेखील पाहिला मिळाले. पंतला अशाप्रकारे चिडविण्याची ही पहिलच वेळ नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पंतला उर्वशीच्या नावाने चिडविण्यात आले.