Vijay Hazare trophy | ऋतुराज गायकवाडचा तडाखा, शतकी हॅट्रिकसह 414 धावा, धवनची जागा धोक्यात?

 विजय हजारे करंडकात  (Vijay Hazare Trophy) महाराष्ट्र टीमचा (Maharashtra Captain) कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सातत्याने चमकदार कामगिरी करतोय.   

Updated: Dec 11, 2021, 03:22 PM IST
Vijay Hazare trophy | ऋतुराज गायकवाडचा तडाखा, शतकी हॅट्रिकसह 414 धावा, धवनची जागा धोक्यात? title=

राजकोट : विजय हजारे करंडकात  (Vijay Hazare Trophy) महाराष्ट्र टीमचा (Maharashtra Captain) कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. ऋतुराजने केरळ विरुद्धच्या सामन्यात (mah vs ker) धमाकेदार शतकी खेळी केली आहे. यासह ऋतुराजने शतकांची हॅट्रिकही पूर्ण केली. यासह धोनीने शोधून काढलेल्या या हिऱ्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील (India Tour South Africa) वनडे मालिकेसाठी आपली दावेदारीही सिद्ध केली आहे.  (Vijay Hazare Trophy mah vs ker maharashtra captain Ruturaj Gaikwad scores 3rd consecutive Century at Madhavrao Scindia Cricket Ground Rajkot) 

ऋतुराजने केरळ विरुद्ध 110 चेंडूत शतक पूर्ण केलं. ऋतुराजने केरळ विरुद्ध एकूण 129 चेंडूत 9 चौकार आणि 3 सिक्ससह 124 धावांची खेळी केली. 

याआधी ऋुतुराजने मध्य प्रदेश विरुद्ध 136 धावांची खेळी केली होती. ऋतुराजनं या खेळीत 112 चेंडूंचा सामना करत 14 फोर आणि 4 सिक्स लगावले होते. तर याआधीच्या सामन्यात छत्तीसगड विरुद्ध 143 बॉलमध्ये नाबाद 154 धावा केल्या. अशा प्रकारे ऋतुराजने सलग 3 सामन्यात एकूण 414 धावा चोपल्या आहेत. 

आफ्रिकेविरुद्ध संधी मिळणार?

ऋतुराजने या धमाकेदार खेळीसह निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. टीम इंडिया लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या वनडे सीरिजसाठी ऋतुराजने आपली दावेदारी सिद्ध केली आहे. त्यामुळे आता निवड समिती या कामगिरीच्या आधारे त्याला वनडे सीरिजसाठी संधी देणार का, याकडे लक्ष असणार आहे.  

ऋतुराजची सातत्यपूर्ण खेळी 

दरम्यान ऋतुराज गेल्या काही काळापासून सातत्याने धमाकेदार कामगिरी करतोय. ऋतुराजने आयपीएलच्या 14 व्या मोसमात आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही आपली छाप सोडली. ऋतुराज आयपीएलच्या 14 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर ठरला. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते.  

ऋतुराजने 14 व्या मोसमातील एकूण 16 सामन्यांमध्ये  636 धावा केल्या होत्या. तसेच ऋतुराज सय्यद  मुश्ताक अली स्पर्धेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. या स्पर्धेत ऋतुराजने 5 डावांमध्ये 259 धावा केल्या होत्या. ऋतुराजकडून आगामी काळात अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. 

शिखर धवनची जागा धोक्यात

ऋतुराजने शानदार खेळीसह टीम इंडियातील सलामीसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. यामुळे गब्बर शिखर धवनचं टेन्शन वाढलंय. धवन गेल्या काही काळापासून अपयशी ठरतोय. त्यामुळे त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्येही संधी देण्यात आली नव्हती. 

तसेच विजय हजारे स्पर्धेत धवन दिल्लीकडून खेळतोय. धवनची या स्पर्धेतील सुरुवातही अपेक्षेप्रमाणे राहिलेली  नाही. त्यामुळे निश्चितच धवनचं टीम इंडियातील स्थान धोक्यात आलं आहे.