Vinesh Phogat post Against Brijbhushan : भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे दिल्लीच्या जंतर मंतरवर जोरदार आंदोलन देखील झालं होतं. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ब्रिजभूषण यांच्यावरील आरोप निश्चित केले होते. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. अशातच आता पॅरिस ऑलिम्पिक स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) पोस्ट करत खळबळ उडवली आहे.
ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी हटवली आहे, असं ट्विट विनेश फोगाटने केलं आहे. विनेश फोगाटने ट्विट करताना दिल्ली पोलीस, दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाला टॅग केलं आहे. विनेश फोगाटच्या आरोपानंतर आता दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुरक्षेत कोणतीही चूक झाली नाही, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय.
जर सुरक्षा जवानांना येण्यास उशीर झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असंही दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा कुस्तीपटूंचं आंदोलन चर्चेत आलंय.
जिन महिला पहलवानों की बृजभूषण के ख़िलाफ़ कोर्ट में गवाहियाँ होने वाली हैं, दिल्ली पुलिस ने उनकी सुरक्षा हटा ली है @DelhiPolice @DCWDelhi @NCWIndia
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 22, 2024
The security provided to the wrestlers hasn't been withdrawn; it was decided to request Haryana Police to takeover the responsibility in future, since the protectees normally reside there.
— DCP New Delhi (@DCPNewDelhi) August 22, 2024
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत दाखल होऊनही वजन वाढल्याने महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पदक जिंकू शकली नाही. अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्टमधील (Court of Arbitration of Sport) सुनावणीनंतर विनेश फोगाटला रौप्यपदक मिळेल अशी आशा भारतीयांना वाटत होती. पण तिथेही तिच्या हाती निराशा आली.