धोनी आणि एक्स गर्लफ्रेन्ड प्रियंकाच्या व्हायरल फोटो मागील सत्य

धोनीच्या आयुष्यात साक्षीची एन्ट्री होण्यापूर्वी प्रियंका होती, पण...

Updated: Jul 7, 2021, 10:09 AM IST
धोनी आणि एक्स गर्लफ्रेन्ड प्रियंकाच्या व्हायरल फोटो मागील सत्य title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni)त्यांच्या दमदार खेळीमुळे चर्चेत कायम असतो, पण त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. धोनीच्या आयुष्यात साक्षीची एन्ट्री होण्यापुर्वी त्यांच्या मनात प्रियंका झा होती. फार कमी लोकांना त्यांच्या नात्याबद्दल माहिती होती.  धोनीच्या पहिल्या लव्हस्टोरीला दुजोरा मिळाला तो म्हणजे बायोपिक 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी'च्या माध्यमातून.  प्रियंकावर धोनीचं प्रचंड प्रेम होतं. पण कार अपघातात प्रियंकाचं निधन झालं आणि  धोनीला मोठा धक्का बसला. 

सांगायचं झालं तर प्रियंका आणि धोनी लग्न देखील करणार होते.  पण नशिबात तर काही वेगळं लिहिलं होत. आता सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  धोनीसोबत प्रियंका असल्याची चर्चा रंगत आहे. शिवाय व्हायरल होत असलेला फोटो फार जुना असल्याचं देखील समोर येत आहे. पण सत्य मात्र पूर्णपेणे वेगळ आहे. 

 व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये धोनीसोबत प्रियंका नाही तर साक्षी आहे. हा फार जुना फोटो आहे. त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धोनी आणि साक्षी एकत्र दिसत आहेत.  धोनी आणि साक्षीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं 'झिवा' आहे. 

दरम्यान, प्रियंकाच्या मृत्यूनंतर धोनीला मोठा धक्का बसला होता. पण याच खासगी आयुष्यातील गोष्टींचा परिणाम मैदानावर कधीचं झाला नाही. धोनीने क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलं आणि तेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकलं.