बापरे! इतकी आहे विराट आणि अनुष्काची संपत्ती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या सध्या खूपच चर्चा आहेत. 12 डिसेंबरला दोघांचा विवाह होणार असल्याची चर्चा आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 9, 2017, 02:06 PM IST
बापरे! इतकी आहे विराट आणि अनुष्काची संपत्ती title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या सध्या खूपच चर्चा आहेत. 12 डिसेंबरला दोघांचा विवाह होणार असल्याची चर्चा आहे.

मागील अनेक दिवसांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची पसर्नल लाइफ जेवढी स्ट्राँग आहे तेवढेच ते स्ट्राँग हे पैशांच्या बाबतीत ही आहे. नुसत्या लग्जरी गाड्यांचाच विचार केला तर दोघांच्या गाड्यांची किंमत कोटींमध्ये आहे.

अनुष्काची प्रॉपर्टी

एका रिपोर्टनुसार अनुष्काची संपत्ती 220 कोटी रुपये आहे. अनुष्का एका सिनेमासाठी 10 कोटी रुपये घेते. तर एखाद्या ब्रँडसाठी ती ४ कोटी रुपये घेते. अनुष्काकडे 4 महागड्या गाड्या आहेत. ज्याची किंमत 5 कोटी आहे. तिने 36 कोटींची गुंतवणूक देखील केली आहे. मागील 3 वर्षात या अभिनेत्रीच्या संपत्तीत 80 टक्क्याने वाढ झाली आहे. पुढच्या 3 वर्षात आणखी 30 टक्के संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. 

विराटची प्रॉपर्टी

टीम इंडियाचा कर्णधार विराट देखील संपत्तीच्या बाबतीत खूप स्ट्राँग आहे. 42 कोटींची प्रॉपर्टी, 18 कोटींची गुंतवणूक, 9 कोटींच्या गाड्या अशी एकूण 390 कोटींची विराटची संपत्ती आहे.

जाहिरांतीसाठी विराट-अनुष्काच्या जोडीची खूप मागणी आहे. विराट हा अनुष्काच्या सिनेमांमध्ये देखील लक्ष देतो. अनुष्काच्या सिनेमाच्या शुटींगदरम्यान तो सेटवर सुद्धा दिसतो.

इटलीमध्ये होणार विवाह 

12 डिसेंबरला इटलीमध्ये दोघांचा विवाह होणार आहे. विवाहासाठी फक्त सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह या दोघांनाच आमंत्रण असल्याचं बोललं जातंय. अनुष्कासाठी 12 हा लकी नंबर आहे म्हणून या तारखेला विवाह होणार असल्याची चर्चा आहे. 

12 आहे लकी नंबर

2008 मध्ये बॉलिवूड निर्माता आदित्य चोपडा यांनी शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत 'रबने बना दी जोडी' सिनेमा केला होता. हा सिनेमा 12 डिसेंबरला रिलीज झाला होता. या सिनेमातून अनुष्काला मोठं यश मिळालं होतं आणि तिच्या करिअरला सुरुवात झाली होती.