अनुष्कासाठी विराट पत्रकारांसोबत भांडला, BCCIने दिली वॉर्निंग

विराट कोहलीचा मैदानात आक्रमकपणा सर्वांनीच पाहिली मात्र अनुष्कासाठी विराट चिडून भांडल्याचा प्रकार समोर आला. नेमकं काय घडलं होतं वाचा सविस्तर

Updated: Jun 15, 2021, 02:43 PM IST
अनुष्कासाठी विराट पत्रकारांसोबत भांडला, BCCIने दिली वॉर्निंग title=

मुंबई: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे. या सामन्याआधी न्यूझीलंड संघाची 15 खेळाडूंची 

टीम जाहीर करण्यात आली आहे. या अंतिम सामन्याआधी पुन्हा एकदा कोहली चर्चात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर अतिशय आक्रमक असतो. पण त्याचा हा रौद्र अवतार 2015च्या वर्ल्ड कप दरम्यान पाहायला मिळाला होता. त्याच्या वागण्यामुळे सर्वच जण अवाक झाले होते. तर बीसीसीआयने कोहलीला वॉर्निंग दिली. 

पत्रकाराशी भिडला कोहली

2015मध्ये विराट कोहली जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये होते तेव्हा एका पत्रकारासोबत त्यांचं भांडण झालं होतं. ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याने पत्रकाराला शिवीगाळ केली आणि गैरशब्दही वापरले. विराटने सगळा राग पत्रकारावर काढला. सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कोणालाच समजलं नाही मात्र त्याने पत्रकाराला टार्गेट केल्याचं नंतर लक्षात आलं. तिथे गदारोळ झाला आणि मॅनेजरला या मॅटरमध्ये मध्यस्ती करावी लागली होती.

अनुष्कासाठी पत्रकारासोबत भांडला विराट

अनुष्काबद्दल छापलेल्या बातमीसाठी विराट संतापला होता. त्या बातमीमुळे विराटचा राग अनावर झाला. त्याने ज्या पत्रकारावर हा राग काढला त्याची मुळात यात चूक नव्हती हे नंतर समोर आलं. चुकीच्या पत्रकारावर राग काढल्यानं विराट कोहलीनं त्याची माफी देखील मागितली होती. मात्र विराटच्या या वागण्यामुळे पत्रकार आश्चर्यचकीत झाले होते. 

BCCIने दिली होती वॉर्निंग

या प्रकरणात टीम इंडियाचे बॉलिंग कोच आणि मॅनेजर यांनी मध्यस्ती करून विराटला शांत केलं. तर बीसीसीआयने या प्रकरणी विराट कोहलीला वॉर्निग दिली. विराट कोहली टीम इंडियाचा होणारा कॅप्टन आहे त्यामुळे त्याने संयम राखायला हवा असंही रवी शास्त्री त्यावेळी म्हणाले होते. हा प्रकार घडला त्यावेळी विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार नव्हता.