Viral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

Updated: Apr 7, 2021, 05:56 PM IST
Viral Video : अनुष्का शर्माने विराट कोहलीला दाखवली ताकद, विराटच्या बोलला, "ओ तेरी…."

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोन्ही कपल नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घडामोडींवरही माध्यमांकडून नजर ठेवली जाते. त्यांचे चाहते देखील त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक असतात. अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि विराटचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनुष्का आणि विराटची केमिस्ट्री नेहमी सारखीच छान दिसत आहे. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश आहेत.

मस्तीच्या मूडमध्ये जोडपे

व्हीडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की, अनुष्काने विराटच्या पाठीमागे उभी आहे. ती त्याला दोन्ही हातांनी उचलण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये ती विराटला उचलण्यात यशस्वी देखील होते. ती विराटला उचलताच विराटच्या तोंडून शब्द बाहेर आले "ओ तेरी…."

खरे तर विराटला वाटत होते की, त्याला उचलने अनुष्काला काही शक्य होणार नाही. परंतु अनुष्काने त्याला उचललेच. 20 सेकंदाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि याला जोरदार पसंती आणि कमेन्ट्स देखील मिळत आहेत. जेव्हा अनुष्काने पहिल्याच प्रयत्नात विराटला उचलले, तेव्हा विराट आनंदी झाला, हे पाहूण अनुष्काला वाटले की, कदाचित तो मस्करी करत आहे.

म्हणून ती म्हणाली Rubbish. त्यानंतर विराटने तिला पुन्हा उचलण्यास सांगितले - Yes, do it again?

अनुष्कावर जेव्हा खरे वाटले नाही तेव्हा तिने  विराटला "परत?". विराट तिला म्हणाला हो! यानंतर अनुष्काने पुन्हा विराटला उचलण्याचा प्रयत्न केला. नंतर अनुष्काला वाटलेकी, तो स्वत: तिला यामध्ये मदत करत आहे. म्हणून मग तिने त्याला स्वत:ला उचलू नकोस असे सांगितले.

अनुष्काने विराटला उचलताणा तू स्वत: माझी मदत करू नकोस, म्हणजे मला माझ्या ताकदीचा अंदाज येईल, असे सांगितले. त्यासाठी अनुष्काने विराटकडून वचन देखील मागितले. विराटने तिला वचन दिले. त्यानंतर अनुष्काने पुन्हा एकदा विराटला उचलले आणि खाली ठेवले. विराटला उचलल्यानंतर अनुष्काला तिच्या ताकदीचा अंदाज आला आणि तिला इतका आनंद झाला की, तिने सेटवर उपस्थित लोकांसमोर आपले बायसेप्स दाखवून आनंद व्यक्त केला.