Corona चा संसर्ग वाढत असताना Virat Kohli चं नागरिकांना आवाहन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर एक खास संदेश दिला.

Updated: Apr 20, 2021, 10:50 PM IST
Corona चा संसर्ग वाढत असताना Virat Kohli चं नागरिकांना आवाहन title=

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना संपूर्ण देश चिंतेत आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या महामारीची दुसरी लाट अत्यंत धोकादायक मार्गाने भारतात पसरली आहे. प्रत्येक राज्यात, मोठ्या प्रमाणात लोकांना या विषाणूची लागण होत आहे. दिल्ली सरकारने एका आठवड्यासाठी लॉकडाउनची घोषणा केली आहे आणि सर्व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशातील अनेक राज्यात लॉकडाउन लादले जात आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सोशल मीडियावर एक खास संदेश दिला. त्यांने दिल्लीत राहणाऱ्य़ा सर्व लोकांना सरकार आणि पोलिसांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तो म्हणाला की, या साथीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारी घेतली पाहिजे. कोहलीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कोरोना नियमांचं पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सध्याच्या कोरोना लाटेला सामोरे जाण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने विशेष आवाहन केले आहे. कोविड प्रोटोकॉल आणि लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान विराट कोहली या व्हिडिओतून करत आहे. आपण सर्वांनी मास्क लावले पाहिजे, सामाजिक अंतर ठेवले पाहिजे आणि सतत आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे. दिल्ली पोलिसांना सहकार्य करा आणि जबाबदारीने वागा. अशा प्रकारेच कोरोनाविरुद्ध भारत विजय मिळवू शकेल.