विराटने पाँटींगची केली बरोबरी, असं करणारा पहिला भारतीय कर्णधार

विराट कोहलीचा आणखी एक विक्रम

Updated: Oct 11, 2019, 03:52 PM IST
विराटने पाँटींगची केली बरोबरी, असं करणारा पहिला भारतीय कर्णधार title=

पुणे : पुणे टेस्टमध्ये भारत दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीकडे वाटचाल करत आहे. विराट कोहलीनं सेंच्युरी झळकावत भारताची बाजू अधिक भक्कम केली आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध शानदार शतक ठोकत टेस्ट करिअरमधील 26वं शतक पूर्ण केलं. 150 रन पूर्ण करताच विराटने एक नवा रेकॉर्ड केला आहे. त्याने सर्व माजी भारतीय कर्णधारांना मागे टाकलं आहे.

विराट कोहलीने 3 सामन्यांच्या सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात 173 बॉलमध्ये 100 रन पूर्ण केले. या दरम्यान त्याने 16 फोर मारले. विराटने कर्णधार म्हणून नवव्यांदा 150 रन केले आहेत. विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियाचे कर्णधार डॉन ब्रॅडमॅन यांची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माइकल क्लार्क, श्रीलंकेचा महेला जयवर्धने, वेस्टइंडीजचा ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथला कोहलीने मागे टाकलं आहे.

रिकी पॉटींगची बरोबरी

कर्णधार म्हणून विराट कोहलीने 19 वं टेस्ट शतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींगची त्याने बरोबरी केली आहे. 25 शतकांसह दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ 25 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे.

अजिंक्य रहाणेनंही हाफ सेंच्युरी केली. कोहली आणि रहाणेनं चौथ्या विकेटसाठी १७८ रन्सची पार्टनरशिप केली. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाला आपलं स्थान अव्वल स्थानी कायम राखायचं असेल तर ही सीरिज जिंकणं गरजेचं आहे. आता पहिली टेस्ट जिंकल्यानंतर दुसरी टेस्ट जिंकत सीरिजमध्ये २-०नं विजयी आघाडी घेण्यासाठी कोहली एँड कंपनी प्रयत्नशील आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक

ग्रॅम स्मिथ - 25 शतक
रिकी पाँटींग/विराट कोहली - 19 शतक
एलन बॉर्डर/स्टीव वॉ/स्टीव स्मिथ - 15 शतक

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये 26 शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये डॉन ब्रॅडमॅन, स्टीव स्मिथ आणि सचिन तेंडुलकरनंतर विराट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ब्रॅडमॅनने 69, स्मिथने 121 आणि सचिनने 136 तर विराटने 138 इनिंगमध्ये 26 वे शतक ठोकले आहे.