close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वेंगसरकरांचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट ६ रन दूर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला पुण्यात सुरुवात झाली आहे.

Updated: Oct 10, 2019, 11:28 PM IST
वेंगसरकरांचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट ६ रन दूर

पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला पुण्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर २७३/३ एवढा झाला आहे. कर्णधार विराट कोहली ६३ रनवर नाबाद आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे १८ रनवर नाबाद खेळत आहे. दुसऱ्या दिवशी विराटला दिलीप वेंगसरकर यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी ६ रनची गरज आहे.

विराट कोहलीने ८१ टेस्टमध्ये ६,८६३ रन केले आहेत. तर वेंगसरकर यांनी ११६ टेस्टमध्ये ४२.१३ च्या सरासरीने ६,८६८ रन केले होते, यामध्ये १७ शतकांचा समावेश होता. दिलीप वेंगसरकर हे भारतासाठी १९७६ ते १९९२ या कालावधीमध्ये खेळले.

वेंगसरकर यांच्याबरोबरच विराटला पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकलाही मागे टाकण्याची संधी आहे. विराट कोहली आणि इंजमाम उल हक या दोघांच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी २५-२५ शतकं आहेत. पहिल्या इनिंगमध्ये विराटचं शतक झालं तर तो २६ शतकांसह स्टीव्ह स्मिथ आणि गॅरी सोबर्स यांची बरोबरी करेल.