Rashid Khan भारावला...; विराट कोहलीने स्वतःची मोलाची गोष्ट दिली भेट

राशिद खानने स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. 

Updated: May 19, 2022, 01:09 PM IST
Rashid Khan भारावला...; विराट कोहलीने स्वतःची मोलाची गोष्ट दिली भेट title=

मुंबई : आयपीएलमुळे अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान याला एक वेगळी ओळख मिळाली. आयपीएलमध्ये चांगला खेळ करत त्याने स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलंय. तर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने या स्टार गोलंदाजाला एक भेट दिली आहे. राशिद खानने स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. 

राशिद खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. या व्हिडीयोमध्ये विराट कोहली आरसीबीच्या जर्सीमध्ये पायाला पॅड बांधून दिसतोय. तर त्याच्या बाजूला गुजरात टायटन्सच्या जर्सीत राशिद खान स्वतः आहे. 

राशिदने या व्हिडीयोला कॅप्शन दिलंय. या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, "तुझ्याशी भेटून मला नेहमीच आनंद होतो. मला दिलेल्या या भेटवस्तूसाठी धन्यवाद." विराटने राशिद खानला त्याची बॅट गिफ्ट केली आहे. यामुळे राशिद फारच आनंदी झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

मुळात राशिदने स्पष्टपणे विराटने त्याला काय गिफ्ट केलं आहे याची माहिती दिली नाहीये. मात्र त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीयोमध्ये राशिद विराटची बॅट निरखून पाहताना दिसतेय. त्यामुळे विराटने राशिदला स्वतःची बॅट गिफ्ट केल्याचा अंदाज लावला जातोय. 

आयपीएलमध्ये आजच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सने प्लेऑफची फेरी गाठली आहे.