आफ्रिकेच्या भूमीत विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या 'या' रेकॉर्डजवळ पोहचला

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघ थोडा मजबुत स्थितीत आला आहे. पण विराट कोहलीच्या या शतकामुळे क्रिकेट संघाला जसा फायदा होणार आहे तसाच एक फायदा विराटच्याही पदरी पडणार आहे. 

Updated: Jan 15, 2018, 04:00 PM IST
आफ्रिकेच्या भूमीत विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या 'या' रेकॉर्डजवळ पोहचला title=

 मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शानदार शतकामुळे भारतीय संघ थोडा मजबुत स्थितीत आला आहे. पण विराट कोहलीच्या या शतकामुळे क्रिकेट संघाला जसा फायदा होणार आहे तसाच एक फायदा विराटच्याही पदरी पडणार आहे. 

विराटचं शतकं 

विराट कोहलीने त्याच्या टेस्ट करियरमधील 21 वे शतक पूर्ण केले आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक करणारा विराट कोहली हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

मागील 25 वर्षांमध्ये आफ्रिकेच्या भूमीत अशाप्रकारे द्विशतक ठोकणारा विराट हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.  

 

सचिनची दमदार कामगिरी 

सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेमध्ये एकूण 5 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिले शतक ठोकले होते. सचिनने दक्षिण आफ्रिकेतील एक दौरा वगळता उर्वरित सार्‍या दौर्‍यांमध्ये शतक झळकावले आहे. सचिनने सर्वप्रथम 1992 साली आफ्रिकेच्या दौर्‍यात शतक झळकावले  होते. त्यानंतर हा सिलसिला सुरू राहिला.  2011 साली दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या दौर्‍यात  सचिनने 146 धावा केल्या होत्या.