टीम इंडियाचा खरा 'बॉस' कोण?; रवी शास्त्रीचे मोठे विधान

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोलहीचे तोंडभरून कौतूक केले

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 20, 2017, 01:56 PM IST
टीम इंडियाचा खरा 'बॉस' कोण?; रवी शास्त्रीचे मोठे विधान title=

मुंबई : टीम इंडियाचा खरा बॉस कोण? हा प्रश्न क्रिकेट वर्तुळात नेहमीच चर्चिला जातो. पण, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रश्न तुर्तास तरी, सुटला आहे. कारण, शास्त्री यांनी टीम इंडियाचा खरा बॉस कोण? याबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. काय आहे ते विधान घ्या जाणून..

काय म्हणाले रवी शास्त्री?

भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोलहीचे तोंडभरून कौतूक केले आहे. शास्त्री यांनी म्हटले आहे की, क्रिकेटबाबत बोलायचे तर, कोहली पहिल्यापासूनच मॅच्यूअर होता. पण, आता तो एक व्यक्ती म्हणूणही चांगलाच मॅच्यूअर झाला आहे. त्यामुळे पूर्ण संघावर त्याचा नेहमीच सकारात्मक प्रभाव पडला आहे. त्यामुळे विराट कोहलीच खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघाचा बॉस आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे प्रशिक्षाचा सल्ला प्रत्येक वेळी माणने त्याला बंधनकारक नाही, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

कोहली जसा दिसतो तसा नाही

पुढे बोलताना शास्त्री यांनी म्हटले आहे की, 'कोहली आणि माझ्यात चांगला संवाद आहे. आमचा स्वभाव एकमेकांशी मिळताजुळता आहे. आमचा एकमेकांच्या कामगिरी आणि निर्णयक्षमतेवर विश्वासही आहे. आम्ही दोघेही केवळ जिंकण्यासाठी खेळतो. वेळकाढूपणासाठी नव्हे.' रविशास्त्री हे त्यांच्या काळातले एक दबंग खेळाडू राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला मोठी पार्श्वभूमी असते. शास्त्रींनी पुढे म्हटले आहे की, आमचा संघ हा केवळ नंबरसाठी खेऴणारा संघ नाही. तर, आमचा संघच सामना आणि संघर्ष करणारा आहे. आम्ही क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. आणि महत्त्वाचे असे की, कोहली हे तसे व्यक्तिमत्व मुळीच नाही. जसे, ते वास्तवात दिसते.' शास्त्री यांनी असाही विराटाच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैला सांगितला आहे.

सल्ला ऐकण्याचे कोहलीवर बंधन नाही

दरम्यान, बोलाताना रवी शास्त्री यांनी असेही म्हटले आहे की, अनेकदा कोहली आणि माझे विचार जुळत नाहीत. मात्र, त्याचा आमच्या नात्यावर मुळीच परिणाम होत नाही. खरे सांगायचे तर, कर्णधारच संघाचा खरा बॉस असतो. त्यामुळे प्रशिक्षकाचा सल्ला कप्तानने ऐकलेच पाहिजे असे बंधन टाकता येणार नाही. तो माझ्याकडे अनेकदा सल्ला मागतो आणि तो मी देतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तो प्रत्येक वेळी ऐकलाच पाहिजे.

रवी शास्त्री यांनी भारतीय संघातून 80 टेस्ट आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत.