ICC T20 World Cup 2022 : टी20 वर्ल्डकप संपला आहे. इंग्लंड संघ यंदाचा चॅम्पियन ठरलाय. त्यांनी पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवला. या विश्वचषका इतका रोमांचक आणि आश्चर्यकारक दुसरा कोणताही विश्वचषक यापूर्वी झालेला नाही. या विश्वचषकात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. विश्वचषकात अनेक फलंदाजांनी चांगली कामगिरी केलीये. या विश्वचषकातील टॉप-5 फलंदाज कोण आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
विराट कोहली ( Virat Kohli )
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया फायनल गाठू शकली नाही. पण विराट कोहलीने या टी20 वर्ल्डकप मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोहलीने या विश्वचषकाच्या सहा डावांमध्ये 98.66 च्या सरासरीने 296 धावा केल्या. त्याने चार अर्धशतके झळकावली. कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 82 रन होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी खेळली आणि पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. यासह कोहली दोन टी-20 विश्वचषकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 2014 आणि 2022 मध्ये त्यांनी हा विक्रम केलाय.
मॅक्स ओ'डॉड ( Max O'Dowd )
नेदरलँड्सचा मॅक्स ओ'डॉड हा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. ज्याने आठ डावात 34.57 च्या सरासरीने 242 धावा केल्या. मॅक्सची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 71 होती.
सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav )
भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव देखील या यादीत आहे. सूर्यकुमारने सहा डावांत 59.75 च्या सरासरीने 239 धावा केल्या. सूर्यकुमारने तीन अर्धशतके झळकावली आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 68 रन होती.
कुसल मेंडिस ( Kusal Mendis )
कुसल मेंडिस चौथ्या स्थानावर आहे. मेंडिसने आठ सामन्यांत 223 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 31.85 होती. या विश्वचषकात मेंडिसने दोन अर्धशतके झळकावली.
सिकंदर रझा ( sikandar raza )
झिम्बाब्वेचा सिकंदर रझा चौथ्या स्थानावर राहिला. त्याने आठ सामन्यांत 219 धावा केल्या. रझाची सरासरी 27.37 होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 होती. रझाने दोन अर्धशतके झळकावली.