Virat Kohli Australia Room Video Leaked: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (virat kohli) सध्या T20 विश्वचषक 2022 साठी ऑस्ट्रेलियात आहे. या स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मागील काही सामन्यांत त्याने दिमाखदार खेळ करत भारताला विजय मिळवून दिला आहे. याचदरम्यान विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडिओ लीक झाला आहे.
यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सोशल मीडियावरून एक व्हिडिओ पोस्ट (video post) करून संताप व्यक्त केला आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याच कारणामुळे इतरांचे खासगी आयुष्य जपायला हवे, असे म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये विराटचे बूट, चष्मा, कपडे दिसत आहेत. याच कारणामुळे विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसेच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे.
माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी. कोणाच्याही खासगी आयुष्यात आक्रमण करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ असे म्हणत विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांच्या खासगी आयुष्याला मनोरंजनासाठी वापर करू नका, असे आवाहनही त्याने केले आहे.
वाचा : भारताच्या 'या' खेळाडूने वाचवली लाज, अर्धशतकासह गोलंदाजांची धुलाई
टीम पर्थमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2022 (t20 world cup) मधील तिसरा सामना रविवारीच पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यामुळे हा व्हिडिओ पर्थमधील हॉटेलचा असल्याचे मानले जात आहे. टीम इंडियाने यापूर्वी मेलबर्न आणि सिडनी येथे दोन सामने खेळले होते. या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहलीची टीम जर्सी, घड्याळ यासारख्या वैयक्तिक वस्तू दिसत आहेत. ज्या विराट कोहलीने गोपनीयतेच्या विरोधात सांगितले आहेत.
विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये
2022 च्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली होती. यानंतर, त्याने नेदरलँड्सविरुद्धही अर्धशतक झळकावले. जरी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 12 धावा करू शकला.