'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?

 शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. 

Updated: Aug 25, 2024, 06:27 PM IST
'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?
(Photo Credit : Social Media)

Virat Kohli About Shikhar Dhawan Retirement : भारताचा स्टार फलंदाज शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी सकाळी अचानकपणे सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून निवृत्ती जाहीर केली. शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.  शिखरने निवृत्ती जाहीर केल्यावर त्याच्या पुढील आयुष्यासाठी अनेकांनी पोस्ट करून शुभेच्छा दिल्या मात्र निवृत्तीच्या निर्णयाला 24 तास उलटूनही शिखर धवनचा जिगरी मित्र विराट कोहली याने कोणतीही पोस्ट न केल्याने चाहत्यांमध्ये काहीशी चर्चा रंगली होती. अखेर विराटने रविवारी त्याच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली. 

शिखर धवनने 2010 रोजी टीम इंडियाकडून वनडेमध्ये पदार्पण केले तर 2011 मध्ये टीम इंडियाकडून त्याला टी 20 क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली.  सुरुवातीला लागोपाठ संघर्ष केल्यावर 2013 पासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केली. त्यावेळी इंग्लंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला टूर्नामेंट ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये देखील धवनने त्याचा हाच फॉर्म कायम ठेवला. या दरम्यान शिखरने अनेक रेकॉर्डस् आपल्या नावे केले. मात्र शिखर धवनला टीम इंडियाकडून खेळण्याची शेवटची संधी 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध मिळाली होती. 
त्यानंतर शिखरला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. अखेर त्याने शनिवारी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 

हेही वाचा : गार्डनमध्ये कॅप्टन रोहितचा सराव, बांगलादेश विरुद्ध टेस्ट सिरीजपूर्वी हिटमॅनची जोरदार तयारी Video

विराट कोहली शिखरच्या निवृत्तीवर काय म्हणाला? 

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि शिखर धवन हे दोघे लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघे दिल्ली टीमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्यानंतर दोघांना सुद्धा अनेक वर्ष टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली. विराट कोहलीने शिखर धवनच्या निवृत्तीवर पोस्ट करत लिहिले, " तुझ्या निर्भय पदार्पणापासून ते भारताच्या सर्वात विश्वासार्ह सलामीवीर बनण्यापर्यंत, तू आम्हाला जपण्यासाठी असंख्य आठवणी दिल्या आहेस. तुझी खेळाबद्दलची आवड, खिलाडूवृत्ती आणि तुझी ट्रेडमार्क स्माईल आम्ही नेहमी मिस करू, परंतु तू दिलेला वारसा कायम राहील. आठवणी, अविस्मरणीय परफॉर्मन्सबद्दल धन्यवाद. मैदानाबाहेरील तुझ्या पुढील डावासाठी तुला शुभेच्छा गब्बर!." 

शिखर धवनची कारकीर्द : 

शिखर धवनने टीम इंडियाकडून 167  वनडे, 68 टी20 आणि 34 टेस्ट सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने वनडेत 6782 धावा, टेस्ट क्रिकेटमध्ये 1759 तर टी 20  मध्ये 2315  धावा केल्या आहेत. शिखर धवनने टेस्ट क्रिकेट खेळताना 7 शतक झळकावली. तर वनडेमध्ये त्याने 17 शतक ठोकली तर टी 20 मध्ये 11 अर्धशतक ठोकण्यात धवनला यश आले होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x