नवी दिल्ली : पाकिस्तानची क्रिकेटमध्ये ओळख त्यांच्या गोलंदाजांमुळे आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वसीम अक्रम, इमरान खान, शोएब मलिक सारखे शानदार गोलंदाज दिले आहे. अशात पाकिस्तानचे काही नवोदित गोलंदाज आपली ओळख बनवत आहेत.
पाकिस्तानचा एका गोलंदाजाचे नाव सध्या चर्चेत आहे. याचे कारणही तसे आहे. त्याने जगातील टॉप तीन फलंदाजांना आपली शिकार बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा २६ वर्षीय रुम्मन रईस याने म्हटले की टीम इंडियाच कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलिअर्स आणि टेस्ट क्रिकेटचा डॉन ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टीव स्मिथला बाद करण्याची इच्छा आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानचा गोलंदाज रुम्मन रईस याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. रईस म्हटला की त्याच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये एक विकेटवर भारतीय कर्णधार विराट कोहलीचे नाव लिहिले असेल. डावखुरा जलद गती गोलंदाज याला विराटला एकदा तरी बाद करायचे आहे. ही त्याच्यासाठी सर्वात मोठी विकेट असणार आहे.
Rumman Raees @rummanraees15 great find of @IsbUnited @thePSLt20 !!
Special thanks to @wasimakramlive @ProfDeano @Rehan_ulhaq @mediagag for looking after him
Part 2 pic.twitter.com/kOeJ29hZxr
— Hamza Mir (@MEEEERUU) February 16, 2018
रईस म्हटला की मी आतापर्यंत स्टीव स्मिथ, विराट कोहली आणि डिव्हिलिअर्सला गोलंदाजी केली नाही. पण विलियम्सन याला गोलंदाजी केली आहे. त्याला बाद करणे खूप अवघड आहे. त्याचे तंत्र योग्य असल्याने त्याला बाद करणे अवघड जाते. पण तरीही मी त्यांची विकेट घेतली आहे.
रईस सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेडकडून दुबईत खेळत आहे.