मुंबईतल्या घरासाठी कोहली देतो एवढं भाडं, डिपॉजिट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परत आल्यानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहली आराम करतोय. 

Updated: Mar 12, 2018, 05:37 PM IST
मुंबईतल्या घरासाठी कोहली देतो एवढं भाडं, डिपॉजिट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परत आल्यानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहली आराम करतोय. विराटनं काहीच दिवसांपूर्वी मुंबईतल्या त्याच्या घराचा फोटो ट्विट केला होता. तेव्हा हे विराटचं घर असल्याचा अनेकांचा समज झाला. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे घर विराटनं खरेदी केलेलं नाही. या घरामध्ये विराट कोहली भाड्यानं राहतो आहे. या घरासाठी विराट कोहली महिन्याला १५ लाख रुपये भाडं देत आहे.

विराटनं २०१६ साली मुंबईतल्या वरळी भागामध्ये विराट कोहलीनं घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत ३४ कोटी रुपये आहे. हे घर बांधून पूर्ण व्हायला आणखी काही वेळ लागणार आहे. त्यामुळे विराट-अनुष्का भाड्याच्या घरात राहत आहेत.

विराट आणि अनुष्काचं भाड्याचं घर एनी बेसंट रोडवर आहे. या घराचा कार्पेट एरिया २,६७५ स्क्वेअर फूट आहे. ४० व्या मजल्यावर विराट-अनुष्काचं हे घर आहे. कोहली सध्या ज्या घरात राहतोय त्या घरासाठी कोहलीनं १.५० कोटी रुपयांचं डिपॉजिट दिलं आहे. याचबरोबर कोहलीनं १.०१ लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटीही भरली आहे.

कोहलीनं २०१६ मध्ये वरळीच्या ओमकार अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट बूक केला आहे. हे घर अजूनही बांधून तयार झालेलं नाही. ७ हजार स्क्वेअर फूट असलेलं हे घर कोहलीला २०१९ ला मिळणार आहे. तोपर्यंत विराट-अनुष्का या भाड्याच्या घरात राहतील. २,६७५ स्क्वेअर फूटचं हे घर या दोघांनी २४ महिन्यांसाठी भाड्यानं घेतलं आहे. रहेजा लिंजड नावाच्या इमारतीत हे दोघं ४०व्या मजल्यावर राहत आहेत.

विराट कोहलीनं या घराचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये बाल्कनीमधून मुंबईतला समुद्र किनारा दिसत होता. जर तुम्हाला घरच्या बाल्कनीमधून असा नजारा दिसत असेल तर तुम्ही दुसरीकडे कुठे जाणं पसंत कराल, असं विराट कोहली हा फोटो शेअर करताना म्हणाला होता.